Home | Khabrein Jara Hat Ke | South Korean mussel barbie

बारीक अंगकाठीमुळे कधीकाळी चिडवायचे लाेक; पण आता म्हणतात ‘मसल बार्बी’

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 11:29 AM IST

द. कोरियाच्या ३४ वर्षीय यियोनचे इन्स्टाग्रामवर १.३७ लाख फॉलोअर्स

  • South Korean mussel barbie
    सेऊल - दक्षिण कोरियात कधीकाळी किरकाेळ शरीरयष्टीमुळे चिडवल्या जाणाऱ्या यियोन-वू या ३४ वर्षीय तरुणीच आज ‘मसल बार्बी’ म्हणून आेळखले जात आहे. शरीराने दिसायला काटक व मजबूत; परंतु मनाने अतिशय काेमल म्हणून तिला नागरिक ‘मसल बार्बी’ म्हणतात. यियोनने अनेक आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या असून, ती तिच्या वयाच्या तरुणींसाठी आदर्श बनली आहे. यियोनला इंटरनेट सेलेब्रिटीही म्हटले जाते. कारण तिचे इन्स्टाग्रामवर एक लाख ३७ हजार फाॅलोअर्स आहेत. कधीकाळी यिओनला लाेकांसमाेर जायला भीती वाटायची. कारण तेव्हा ती अंगकाठीने खूपच बारीक हाेती. त्यामुळे ती निराश असायची; परंतु एके दिवशी तिने निराशा झटकून व्यायाम करून स्वत:ला बदलायचे ठरवले.

Trending