आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाचा विद्यार्थी गुन संग साधतो अस्खलित हिंदीतून संवाद, भारताचे राष्ट्रगीतही म्हणून दाखवले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 औरंगाबाद -  बारीक डोळे, गोऱ्यापान रंगाचा दक्षिण कोरियन विद्यार्थी पाहून कोणालाही वाटणार नाही की तो चक्क हिंदी बोलता येते, पण तो केवळ हिंदीच नव्हे तर उर्दू, तामिळ या भाषा उत्तम बोलतो. भारताचे राष्ट्रगीत त्याला मुखपाठ आहे हे विशेष. गुन मो संग हा २२ वर्षांचा कोरियन तरुण पहिल्यांदाच भारतात आला. रविवारी मुंबईहून दौलताबाद, वेरुळ, अजिंठा लेणी पाहण्यासाठी आला. शहरातील विनोदकुमार जैस्वाल यांची त्याच्यासोबत रेल्वेत भेट झाली. गुन मो संग ला हिंदी बोलता येते म्हटल्यावर त्यांची मैत्री झाली. त्यांनी त्याला शहराची सफर घडवली. गुनने दिव्य मराठी कार्यालयास भेट देऊन गप्पा मारल्या.  

 

भारतीय भाषा खूप गोड म्हणून शिकलो  
गुन मो संग म्हणाला, मी दक्षिण कोरियातील सू वॉग शहरातील हनकुक विद्यापीठात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तेथे कोरियन शिक्षकच मला भारतीय भाषा शिकवतात. हिंदी शिकण्यासाठी मला चार वर्षे लागली. संस्कृत, उर्दू आणि तामिळ भाषाही मी शिकत आहे. माझे काही मित्र मनुस्मृतीचा अभ्यास करत आहेत. भारतीय भाषा सुरुवातीला अवघड वाटल्या, पण शिकण्यास सुरुवात केली तेव्हा त्या खूप गोड आणि सोप्या वाटल्या. गुनने भारताचे राष्ट्रगीत खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. तो म्हणाला पंतप्रधान मोदी मला खूप आवडतात. ते कोरियात आले होते. तेव्हा त्यांची भेट घेण्याची संधी मात्र मिळू शकली नाही.    

 

तिखट पदार्थ आवडतात  
मला भारतीय जेवण खूप आवडले. समोसा, तंदुरी रोटी, अनेक तिखट पदार्थ मला आवडतात. कोरियन लोकांना भारतीय तिखट पदार्थ खूप आवडतात.   


तीन खानांचे सिनेमे पाहतो  
गुन  म्हणाला, मी हिंदी सिनेमे पाहतो. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांचे सिनेमे मला आवडतात. चेन्नई एक्स्प्रेस, थ्री इडियट, पीके हे चित्रपट अनेकदा पाहिले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...