आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • South Korea's No Marriage Woman Campaign, New Crisis Before Government, Marriage Offices Closed Due To No Marriage

दक्षिण कोरियात महिलांची नो मॅरेज वुमन मोहीम, सरकारपुढे नवे संकट, लग्नेच होत नसल्याने अनेक मंगल कार्यालये बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो/सेऊल : दक्षिण कोरिया व जपानमध्ये महिला लग्नास नकार देत असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. येथे महिलांचे अनेक गट असून ते लग्नास व नंतर आई होण्यास तयार नाहीत. दोन्ही देशांचा समावेश जगातील कमी जनन दर असलेल्या देशांत झाला आहे. यात जपान पहिल्या तर दक्षिण कोरिया आठव्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियात महिलांनी जाहीरपणे हॅशटॅग नाे मॅरेज वुमन अशी मोहीम सुरू केली आहे. याद्वारे महिलांनी नो डेटिंग, नो सेक्स, नो मॅरेज व नो चिल्ड्रन या चार गोष्टी पाळण्याचा सल्ला दिला आहे. महिलाच लग्नास तयार होत नसल्याने येथील अनेक विवाह कार्यालये बंद पडत आहेत. सरकारला या धोरणामुळे पुढील भवितव्याची काळजी वाटते आहे. सरकारने तरुणांना लग्न करणे सुरू करा, असे आवाहन केले आहे. 

सरकार त्यांना पैसे देत आहे. दक्षिण कोरियात परिस्थिती किती िबघडत चालली आहे, याचा अंदाज पुढील बाबीवरून येतो. दहा वर्षांपूर्वी सुमारे ४७% महिला लग्न आवश्यक असल्याचे मानत होत्या. परंतु गेल्या वर्षी हीच आकडेवारी घसरून २२.४ टक्क्यांवर आली आहे. येथे सरकारकडून लग्नासाठी व पिता होण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवली आहे. येथे अनेक राज्यांत सरकारकडूनच त्यांची उंची, वजन, फोटो व वैयक्तिक माहिती मागवली आहे. दक्षिण कोरियात लोकसंख्या घटत चालल्याने कामगारांची संख्या कमी होते आहे. सेऊलमध्ये तर २० टक्क्यांहून अधिक विवाह कार्यालये बंद पडली अाहेत. सेऊलच्या अनेक शाळांतून शिक्षणासाठी मुले मिळत नसल्याने शाळांही बंद पडताहेत. सेऊलच्या बोनी ली यांनी म्हटले, माझा आनंद मी ठरवेन. मला पुरुषांशी संबंध ठेवण्यात रस नाही. अशी मी एकटीच नाही तर दक्षिण कोरियात अशा महिलांची संख्या वाढते आहे.त्या पितृसत्ताक पद्धतीला विरोध करत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...