आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

360 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा साऊथचा कॉमेडियन, कोट्यवधींची जमीन आणि लग्झरी कारचे आहे कलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अतिशय छोट्या भूमिकेतून केली, पण आता ते यशोशिखरावर आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदवीर ब्रह्मानंदम प्रसिद्ध तेलगु डायरेक्टर जन्धयाला यांनी 'मोद्दाबाई' या नाटकातील ब्रह्मानंदम यांचा अभिनय बघून 'चन्ताबाबाई' या सिनेमात एक छोटीशी भूमिका दिली होती. त्यानंतर ब्रह्मानंदम यांनी मागे वळून पाहिले नाही. ब्रह्मानंदम आज सुमारे 360 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी 1000 हून अधिक सिनेमांमध्ये काम करुन वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.


अनेक लग्झरी कार आणि अॅग्रीकल्चर फार्मचे आहेत मालक... 
- ब्रह्मानंदम यांच्याकडे Audi R8, Audi Q7, मर्सिडीज बेंज (ब्लॅक) आणि इनोवा या लग्झरी कार आहेत. याशिवाय कोट्यवधी रुपयांची शेतीसुद्धा त्यांच्याकडे आहे. 
- याशिवाय ब्रह्मानंदम यांच्याजवळ हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश परिसरात एक आलिशान बंगला आहे. 
- ब्रह्मानंदम एका सिनेमासाठी एक कोटी रुपये मानधन घेतात. स्वतःची लोकप्रियता बघून त्यांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे.

 

आंध्रप्रदेशात झाला जन्म..
आंध्र प्रदेशातील साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात 1 फेब्रुवारी 1956 रोजी ब्रह्मानंदम यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात ब्रह्मानंदमच एकमेव एमए पर्यंत शिकलेले सदस्य होते. त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतल्यानंतर अत्तिल्ली कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करुन हसवायचे. एकेदिवशी इंटर कॉलेज ड्राम कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर नाटकात त्यांची रुची वाढत गेली. याचदरम्यान तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक जन्धयाला यांनी ब्रह्मानंदम यांना 'मोद्दबाई' नावाच्या नाटकात अभिनय करताना पाहिले. नाटकातील त्यांच्या अभिनयाने इम्प्रेस होऊन दिग्दर्शक जन्धयाला यांनी त्यांना आपल्या 'चन्ताबाबाई' या सिनेमात ब्रह्मानंदम यांना एक छोटी भूमिका ऑफर केली. अशाप्रकारे ब्रह्मानंदम यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. 


साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात असतात ब्रह्मानंदम...
ब्रह्मानंदम असे एक अभिनेते आहेत, जे साऊथच्या प्रत्येक दुस-या सिनेमात दिसतात. प्रत्येक अभिनेता आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतो. ब्रह्मानंदम यांनी सांगितले, की एकदा त्यांच्या मित्राने त्यांचे नाव ब्रह्मानंदम हे कसे पडले याविषयी त्यांना विचारणा केली. माझ्या वडिलांनीसुद्धा या नावाचा अर्थ मला सांगितला नव्हता. मग मी नावाचा अर्थ शोधून काढला. तेव्हा मला समजले, की माझ्या नावचा अर्थ (द हॅपीनेस ऑफ द यूनिवर्स) म्हणजेच ब्रम्हांडचा आनंद असा होतो.


देवाने मला हसवण्यासाठीच पाठवले आहे... 
ब्रह्मानंदम म्हणतात, माझ्या मते प्रत्येक कलाकार माझ्याप्रमाणेच हार्ड वर्क करतो. मात्र माझ्या मते, लोक अद्याप मला बघून थकलेले नाहीत. मला वाटतं, की देवाने मला लोकांना हसवण्यासाठीच जगात पाठवले आहे. 

 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे नावाची नोंद 

ब्रह्मानंदम यांनी दोन दशकांपेक्षा जास्त करिअरमध्ये 1000 पेक्षा अधिक सिनेमांत काम केले आहे. ‘अहा ना पेल्लंता’, ‘अप्पुला अप्पा राव’, ‘किंग’, ‘रेड्डी’, 'रच्चा' 'आर्या 2' आणि ‘बपालू’ ही त्यांच्या काही हिट सिनेमांची नावे आहेत. त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना 2009 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2007 मध्ये त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. एकाच भाषेतील 700 चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल त्यांच्या नावाची नोंद झाली. 


ब्रह्मानंदम यांना आहेत दोन मुले...
ब्रह्मानंदम यांच्या सिनेमांविषयी लोकांना बरेच काही ठाऊक आहे, मात्र त्यांच्या कुटुंबाविषयी लोकांना फारसे काही ठाऊक नाही. ब्रह्मानंदम यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मी कन्नेगंती आहे. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. थोरल्या मुलाचे नाव राजा गौतम तर धाकट्याचे नाव सिद्धार्थ आहे. राजा गौतमने 2004 मध्ये 'पल्लाकिलो पेल्लि कुटुरु' या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते.

बातम्या आणखी आहेत...