आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यूनिअर NTRच्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर आणखी एका दाक्षिणात्‍य स्टारच्या कारला अपघात, 2 वर्षांची चिमुकली ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ज्यूनिअर एनटीआरच्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर आणखी एका साऊथचा प्रसिद्ध गायक आणि वायोलिन वादक बालाभास्करच्या कुटूंबाचा भीषण अपघात झाला. ते कुटूंबासोबत त्रिसूरमध्ये एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. येथून घरी परतत असताना मंगळवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी थिरुअनंथपुरमजवळ पालीपुरम रोडवर हा अपघात झाला. या अपघातात बालाभास्कर यांची 2 वर्षांची मुलगी तेजस्विनी हिचा जागीच मृत्यू झाला आहे.


पत्नी गंभीर जखमी
- रिपोर्टनुसार, बालाभास्कर याच्यासह पत्नी गंभीर जखमी झाली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. यासोबतच कार चालक यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
- बालाभास्करची भरधाव कार एका झाडाला धकडली. पोलिस पेट्रोलिंग यूनिटने जखमींना तातडीने  हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. परंतु, दोन वर्षीय तेजस्वीनीचा मृत्यू झाला. तिचे पार्थिव सध्या हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे. 


स्टेज शो करतो बालाभास्कर 
- बालाभास्कर साऊथमध्ये स्टेज शोजसाठी प्रसिद्ध आहे. सिंगरने वयाच्या 12 व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 
- मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये बालाभास्करने खुप योगदान दिले आहे. तो फोक आणि दक्षिण भारतीय संगीत एकत्र करुन फ्यूजन बनवतो, याला खुप पसंती मिळते.

बातम्या आणखी आहेत...