आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD Prabhas : 8 कोटींच्या रोल्स रॉयस मधून फिरतो 'प्रभास', साऊथ स्टार्सचे Car Collection

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य स्टार्ससुध्दा लग्झरी कारचे शौकीन आहेत. 'बाहुबली' प्रभासविषयी बोलायचे झाले तर, त्याच्याकडे महागडी कार म्हणून ओळखली जाणारी रोल्स रॉयस फँटम ही कार आहे. या कारची किंमत तब्बल 7 ते 8 कोटींच्या घरात आहे. 23 ऑक्टोबर 1979 ला जन्मलेल्या तेलगू सिनेसृष्टीतील या अभिनेत्याने ‘बाहुबली : द बिगनिंग’(2015) या सिनेमातून प्रेक्षकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

]

'बाहुबली'मुळे प्रसिद्धीझोतात आला प्रभास...
- प्रभास तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे.
-‘बाहुबली’ या सिनेमामुळे प्रभास बॉलिवूडच्या चाहत्यांमध्येही लोकप्रिय झाला.
- प्रभास प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते उप्पलापति वेंकटा कृष्णम राजू यांचा भाचा आहे.
- 2002 मध्ये 'ईश्वर' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या प्रभासने छत्रपती
(2005), बिल्ला(2009), एक निरंजन (2009), डार्लिंग (2010), रिबेल (2012) आणि मिर्ची (2013) या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
- प्रभास ‘अॅक्शन जॅक्सन’ या बॉलिवूड सिनेमात कॅमिओ रोलमध्ये झळकला आहे.

 

प्रभास आज (23 ऑक्टोबर) वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्याप्रमाणेच दक्षिणेतील नावाजलेल्या अभिनेत्यांकडे कोणत्या कार आहेत, याचा आढावा आम्ही घेतलाय. चला एक नजर टाकूया अशाच दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या लग्झरी कार कलेक्शनवर..

बातम्या आणखी आहेत...