आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • South Superstar And Chiranjeevi Younger Brother Pawan Kalyan Road Accident In Andhra Pradesh While Going To Attend Political Rally, Injured Security Guard Admit In Hospital

साउथ सुपरस्टार आणि चिरंजीवीचा धाकटा भाऊ पवन कल्याणचा रस्ते अपघात, राजकीय कार्यक्रमात जाताना कारला ट्रकची धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. साउथ फिल्मचा सुपरस्टार आणि चिरंजीवीचा लहान भाऊ पवन कल्याणचा गुरुवारी रात्री रोड अॅक्सींडेट झाला. अभिनयासोबतच राजकारणातही अॅक्टिव्ह राहणारा पवन एक राजकीय रॅली अटेंड करण्यासाठी ककिनंदा (आंध्रप्रदेश) मधून राजन ग्राम येथे जात होता, याच वेळी वेगाने येणारी त्याची कार ट्रकला धडकली. या अपघातात पवनला जखम झाली नाही, पण त्याचे पर्सनल सिक्योरिटी गार्ड जखमी झाले आहे. त्यांना ककिनंदाजवळच एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावर्षी जानेवारीमध्ये पवनचा 'Agnyathavaasi' चित्रपट रिलीज झाला आहे. यानंतर तो आपल्या पॉलिटिकल करिअरकडे लक्ष देत आहे. 

 

पवन कल्याणने 16 वर्षात केले तीन लग्न 
- गब्बर सिंह फेम पवन कल्याणची पहिली पत्नी नंदिनी होती. 1997 मध्ये त्याने तिच्यासोबत लग्न केले होते. हे लग्न फक्त दोन वर्षे चालले. 1999 मध्ये हे दोघं वेगळे झाले. 
- यानंतर पवनने 2009 मध्ये रेनू देसाईसोबत लग्न केले. हे लग्न जास्त काळ चालले नाही आणि 3 वर्षांनंतर 2012 मध्ये ते वेगळे झाले. रेनू देसाई आणि पवनला दोन आपत्य आहे, मुलाचे नाव अकीरा आणि मुलीचे आध्या आहे. 
- अभिनेत्यापासून राजकारणी बनलेल्या पवनने 2013 मध्ये अन्ना लेजनेवासोबत लग्न केले. त्याचवर्षी अन्ना आणि पवनला एक मुलगी झाली. अन्ना लेजनेवा रशियन वंशाची आहे. 2011 मध्ये तिची आणि पवनची पहिली भेट झाली होती.
- एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्याचवर्षी दोघांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव पोलेना आणि एक मुलगा मार्क शंकर पवनोविच आहे.

 

कोण आहे पवन कल्याण
- 2 सप्टेंबर, 1971 मध्ये आंध्र प्रदेशच्या बपतलामध्ये जन्मलेल्या पवनचे खरे नाव कोन्निडेला कल्याण बाबू आहे. पवन कल्याणला टॉलिवूडमध्ये पावर स्टार म्हटले जाते.
- तेलुगु चित्रपटाचा अॅक्टर असलेला पवन कल्याण फिल्म डायरेक्टर, सिंगर, कोरियोग्राफर आणि स्क्रीन रायटर आहे. पवन कल्याण एक ट्रेंड मार्शल आर्टिस्ट आहे आणि त्याच्याजवळ ब्लॅक बेल्ट आहे.
- पवनने Khushi (2001), Jalsa (2008), Gabbar Singh (2012), Attarintiki Daredi (2013) आणि Gopala Gopala (2015) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 

 

राजकारणात एंट्री
- पवन कल्याण मार्च 2014 मध्ये राजकारणात आला आणि त्याने जनसेवा पार्टीची स्थापना केली.
- पवन 2013 मध्ये फोर्ब्सच्या लिस्टमध्ये भारताच्या 100 सेलिब्रिटीमध्ये आला होता.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...