आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

210 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे साउथचा हा सुपरस्टार, 100 कोटींच्या फक्त कार आहेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/कोच्ची: मल्याळम आणि तामिळ सिनेमांचे सुपरस्टार ममूटी 67 वर्षांचे झाले आहेत. 7 सप्टेंबर 1951 मध्ये कोच्ची येथे त्यांना जन्म झाला. त्यांचे खरे नाव मुहम्मद कुट्टी पनिपरमबिल इस्माइल आहे. ममूटी आपल्या अॅक्टिंगसोबतच लग्जरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. नेटवर्थविषयी बोलायचे झाले तर finapp.co.in वेबसाइटनुसार ममूटी 210 कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. यासोबतच ते प्रत्येक सिनेमासाठी 2.5 ते 3.5 कोटीं रुपये चार्ज करतात. 


एक-दोन नाही, ममूटीजवळ आहेत अनेक कार 
ममूटी यांना कारचा शौक आहे. त्यांच्याजवळ एक-दोन नाही तर 369 कार आहेत. एवढेच नाही, ममूटीने काही वर्षांपुर्वी देशाची पहिली मारुती-800 खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ममूटीने आपल्या कारसाठी वेगळे गॅरेज बनवले आहे. त्यांना स्वतःलाच कार ड्राइव्ह करायला आवडते. मेगास्टार ममूटी यांच्या कलेक्शनमध्ये जगुआर XJ-L(कॅवियर) सर्वात लेटेस्ट आहे. याचे दोन्हीही व्हर्जन (पेट्रोल-डीज़ल) ममूटीने खरेदी केले आहेत. तसेच याचे रजिस्ट्रेशन नंबरही (KL 7BT 369)  त्यांच्या 369 कलेक्शनवर आधारित आहे. त्यांच्या जास्तीत जास्त कारचे नंबर 369 यावर आधारित आहेत. जास्तीत जास्त कारचा नंबर 369 हा आहे. ममूटीच्या सर्व कारविषयी बोलायचे झाले तर यांची किंमत 100 कोटींच्या जवळपास आहे. 

 

ममूटीच्या कलेक्शनमध्ये या लग्जरी कार 
ममूटीच्या कलेक्शनमध्ये टोयोटा लँड क्रुजर LC 200, फरारी, मर्सडीज आणि ऑडी चे अनेक मॉडल, पोर्श, टोयोटा फॉर्च्यूनर, Mini Cooper S, F10 BMW 530d आणि 525d, BMW M3, Mitsubishi Pajero Sport, फॉक्सवॅगन पॅसेट X2 सोबतच ऑडी आणि जगुआरही आहे. ममूटी यांच्याजवळ आयशर यांची एक कॅरावॅन आहे, जी त्यांनी मॉडिफाय केली आहे. ममूटी हे ऑडी खरेदी करणारे साउथचे पहिले स्टार आहेत. 


4 कोटींच्या बंगल्यात राहतात 
ममूटी यांचे घर कोच्चीमध्ये केसी जोसेफ रोडवर आहे. हे घर त्यांनी 2012 मध्ये खरेदी केले होते. सध्या याची किंमत अंदाज 4 कोटी असेल. यासोबतच त्यांची 65 कोटींची पर्सनल इन्वेस्टमेंट आहे. ममूटी मल्याळम कम्युनिकेशनचे चेअरमन आहेत. या अंतर्गत अनेक मल्याळम चॅनल येतात. यामध्ये  कैराली टीवी, पीपुल टीवी आणि डब्ल्यूई टीवीचा समावेश आहे.


या ब्रांडला एंडोर्स करतात ममूटी 
ममूटी अनेक ब्रांड्सचे एम्बेसडर आहेत. यामध्ये ब्यूटी सोपपासून ज्वेलरी आणि बँकिंग प्रोडक्टचाही समावेश आहे. ममूटी साउथ इंडियन बँक, इंदुलेखा व्हाइट सोप, कल्याण स्किल्स, सारस आणि इन्वायर्नमेंट कंजर्वेशन प्रोजेक्टची जाहिरात करतात. ममूटी यांची एंटोर्समेंट फीस 1 कोटी रुपये प्रती प्रोडक्ट आहे. यासोबतच ते सरकारसाठी अनेक पब्लिक सर्विस इनीशिएटिव्ह जसे की, 'माय ट्री चैलेंज', एंटी ड्रग कैम्पेन- 'एडिक्टेड टू लाइफ' हे करत असतात. 

 

40 वर्षात 350 चित्रपट 
ममूटी यांनी आपल्या 4 दशकांच्या दिर्घ करिअरमध्ये 350 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट 'विलक्कांउन्दु स्वप्नंगल' (1980) हा होता. याचवर्षी त्यांनी 'मेला' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. 1981 मध्ये त्यांना 'अहिंसा' या चित्रपटात बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा स्टेट अवॉर्ड मिळाला होता. त्यांनी 1984 ते 1993 पर्यंत जवळपास 150 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. 1986 च्या दरम्यान त्यांनी 35 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 'थीरम तेंदुन्ना थीरा' (1983), 'रुग्मा' (1983), 'कोट्टायम कुंजाचान' (1990), 'कनलकट्टू' (1991), 'सागरम साक्षी' (1994), 'राजमनिक्यम' (2005), 'मिशन 90 डेज' (2007), 'द ट्रेन' (2011), 'फेस 2 फेस' (2012) सोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 

 

बातम्या आणखी आहेत...