आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आणि अॅक्टर रामचरण तेजा त्याच्या वर्कआऊट व्हिडिओमुळे चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये रामचरण जोरदार वर्कआऊट करताना दिसत आहे. तो हे वर्कआऊट चित्रपटात अॅक्शन सीनपूर्वी बॉडी कॅमेऱ्यात चांगली दिसावी म्हणून करतो. त्याचा फिटनेस ट्रेनर कशाप्रकारे त्याला ट्रेनिंग देत आहे हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रामचरण थकेपर्यंत ट्रेनर त्याला वर्कआऊट करायला लावतो. रामचरण सध्या बाहुबली फेम डायरेक्टर एसएस राजामौली यांचा चित्रपट करतोय. त्याच्या अॅक्शनसाठीच तो बॉडी टोन करत आहे.
100 कोटींच्या घरात राहतो
- रामचरणची संपत्ती 250 कोटींहून जास्त आहे. त्याच्या कमाईची मुख्य साधने एअरलाइन कंपनी, पोलो रायडिंग क्लब, Obstacle रनिंग सिरीज, डेव्हील्स सर्किट, कोनिडेला प्रोडक्शन कंपनी, मां टीव्हीतील शेअर्स, अपोलोमध्ये पोलो रायडिंग क्लबमधील शेअर्स ही आहेत.
- रामचरण 100 कोटींच्या घरात राहतो. त्यात वर्ल्ड क्लास अॅम्नेटीज आहेत. भिंतीवर प्रचंड महागडे पेंटिंग्ज आहेत.
- चिरंजीवीप्रमाणेच रामचरण तेजानेही दाक्षिणात्य आणि त्यातही तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. त्याने 'चिरुथा' (2007), 'नायक' (2013), 'येवाडू' (2014) आणि 'ब्रूस ली : द फाइटर' (2015) सारखे हिट चित्रपट दिले आहेत. हिंदीत त्याने 2013 मध्ये 'जंजीर' मध्ये काम केले होते. तो पण तो प्रचंड फ्लॉप ठरला.
उद्योजकाच्या नातीशी लग्न
रामचरणने 14 जून, 2012 रोजी अपोलो हॉस्पिटल्सचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डी यांची नात उपासना कमिनेनी हिच्याशी लग्न केले होते. त्याने 2016 मध्ये त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले त्याचे नाव 'कोन्निडेला प्रोडक्शन कंपनी' आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.