आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : साऊथच्या चित्रपटातील सुपरस्टार राम चरण तॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपटात 'चिरुथा' ने 2007 मध्ये त्याने आपल्या करियरची सुरुवात केली होती. राम चरणचेही फॅन फॉलोइंग त्याचे पिता चिरंजीवी यांच्याप्रमाणेच खूप जास्त आहे. पण राम चरण अद्याप सोशल मीडियावर जास्त सक्रिय नव्हता. फॅन्स त्याच्या फोटोजसाठी वाट पाहतात पण तो इंस्टाग्राम वापरात नसल्याने फॅन्सला आतापर्यन्त फेसबुकवरच काम भागवावे लागत होते.
पण आता मात्र राम चरणने फॅन्ससाठी एक पाऊल उचलले आहे. फॅन्सच्या मोठ्या डिमांडमुळे राम चरणने इंस्टाग्रामवर डेब्यू केला आहे. त्याने आपला अपकमिंग चित्रपट 'RRR' मधील आपला लुक शेअर केला. इंस्टाग्रामवर राम चरणला फॉलो करणाऱ्या फॅन्सची संख्या 2 लाख 29 हजारपेक्षाही जास्त झाली आणि हे केवळ एका दिवसात झाले आहे. याचदरम्यान राम चरणची पत्नी उपासनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राम चरण पूलमध्ये आहे आणि आपल्या इंस्टाग्रामवरील डेब्यूबद्दल सर्वांना सांगत आहे. रामचरणची गणना साउथच्या सुपर स्टार्समध्ये होते, मात्र त्याने बॉलिवूडमध्ये केवळ एकच चित्रपट 'जंजीर' केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.