आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

138 कोटींच्या दोन आलीशान घरांबरोबरच प्रोडक्शन आणि एयरलाइन कंपन्यांचा मालक आहे हा सुपरस्टार, चित्रपटांव्यतिरिक्त इतर सोर्सेसनेही करतो खूप कमाई, 13 कोटींच्या तर आहेत केवळ CAR  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : साउथ फिल्मचा सुपरस्टार आणि चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा 34 वर्षांचा होणार आहे. 27 मार्च, 1985 ला हैदराबादमध्ये जन्मलेल्या रामचरणने करियरची सुरुवात 2007 मध्ये आलेली फिल्म 'चिरुथा' ने केली होती. तेव्हापासून आत्त्तापर्यँत 12 वर्षांच्या करियरमध्ये त्याने 14 फिल्ममध्ये काम केले आहे. मात्र तरीही रामचरण कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. रामचरण एका फिल्मसाठी सुमारे 12 ते 15 कोटी रुपये चार्ज करतो.  

फिल्मव्यतिरिक्त दुसऱ्या सोर्सेसनेही कमाई करतो...
वेबसाइट finapp.co.in च्या रिपोर्टनुसार, रामचरण तेजा सध्या 1250 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. त्याच्या कमाईचा सोर्स केवळ चित्रपटच नाही तर दुसरेही काही सोर्सेस आहेत. त्याच्या इनकमचे मुख्य सोर्स एयर लाइन कंपनी, पोलो रायडिंग क्लब, Obstacle रनिंग सीरीज, डेविल्स सर्किट, कोनिडेला प्रोडक्शन कंपनी, मां टीव्हीमध्ये शेअर्स, अपोलोमध्ये पोलो रायडिंग क्लबचे शेअर आहे. 

एयरलाइन कंपनीचा मालक आहे रामचरण...
रामचरण ट्रूजेट एयरलाइनचा डायरेक्टर आहे. त्याने 2013 मध्ये याची सुरुवात केली होती. याचे हेडक्वाटर हैदराबाद येथे आहे. ही एयरलाइन साउथसोबतच महाराष्ट्र आणि गोव्यामध्येही सर्व्हिस प्रोव्हाइड करते. 

कोट्यवधींमध्ये आहे रामचरणची ब्रँड एंडोर्समेंट फीस...
रामचरण साउथमध्ये अनेक प्रसिद्ध ब्रॅंड्सचे एंडोर्समेंट करतो. यामध्ये पेप्सी, टाटा डोकोमो, वोलाना आणि अपोलो जियो अशा कंपन्या आहेत. रामचरणची ब्रँड एंडोर्समेंट फीस सुमारे 1.8 कोटी रुपये आहे. यासोबतच त्याने सुमारे 150 रुपयांचे पर्सनल इन्वेस्टमेंटदेखील करून ठेवले आहे. 

कार कलेक्शनमध्ये आहेत अनेक लग्झरी गाड्या...
रामचरण लग्झरी कारचा चाहता आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये जगातील सर्वात प्रसिद्ध कारमध्ये सामील असलेली एस्टन मार्टिन (5.8 कोटी) आहे आणि त्याव्यतिरिक्त BMW-7 सीरिज (1.32 कोटी), मर्सडीज बेंज एस क्लास (2.73 कोटी), रेंज रोवर वोग (3.5 कोटी) सारख्या लग्झरी कारचा समावेश आहे.  या गाड्यांची किंमत 13 कोटींपेक्षाही जास्त आहे. 

याचवर्षी खरेदी केला आहे 38 कोटींचा बंगला...
साउथ फिल्मचा सुपरस्टार राम चरण तेजाने नवीन घर खरेदी केले आहे. त्याच्या नव्या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. हे घर हैदराबाद, जुबली हिल्स येथे आहे. राम चरणकडे आधीपासूनच एक घर आहे, त्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. घरात वर्ल्ड क्लास एमेनिटीज आहेत. घराच्या भितींवर महागड्या पेंटिग्स आहेत.

बॉलिवूडमध्ये केला केवळ एकच चित्रपट...
रामचरण साउथच्या सुपरस्टार्स एक मानला जातो, पण त्याने बॉलिवूडमध्ये केवळ एकच फिल्म केली आहे. अमिताभ बच्चन यांची सुपरहिट फिल्म 'जंजीर' चा रिमेक याचनावाने 2013 मध्ये बनलेल्या फिल्ममध्ये रामचरणने प्रियांका चोप्रासोबत काम केले होते. फिल्म अतिशय वाईट पद्धतीने फ्लॉप झाली. त्यानंतर तो कोणत्याही बॉलिवूड फिल्ममधे दिसला नाही. रामचरणने 'मगधीरा' (2009), 'ऑरेंज' (2010), 'नायक' (2013), 'येवदु' (2014), ध्रुव (2016), रंगस्थलम (2018), विनय विधेया रामा (2019) अशा सुपरहिट फिल्ममध्ये काम केले आहे. रामचरण लवकरच बाहुबलीचे डायरेक्टर एसएस राजामौलीच्या फिल्म RRR मध्ये दिसणार आहे. 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनत असलेली ही फिल्म 2020 मध्ये रिलीज होणार आहे. 

बिझनेसमनच्या नातीसोबत केले लग्न 
-रामचरणने 14 जून, 2012 ला अपोलो हॉस्पिटलच्या एग्जीक्यूटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...