आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिणेचा सुपरहिट : 'विक्रम वेधा'च्या रिमेकसाठी शाहरुखला पुन्हा आॅफर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकदोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला दक्षिणेचा सुपरहिट चित्रपट 'विक्रम वेधा' च्या हिंदी रिमेकवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाविषयी अपडेट माहिती अशी की, निर्मात्यांनी पुन्हा एकदा यात एंटी हिरोच्या भूमिकेसाठी शाहरुखला अप्रोच केले आहे. अप्रोच केल्यानंतर शाहरुख आपल्या निर्णयावर रीकंसीडर करू शकतो, असे निार्मत्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच जुलैमध्ये त्याला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. दुसरीकडे माधवन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही विक्रमची भूमिका करणार आहे. जो मूळ चित्रपटात होती. 

नीरज पांडे असतील दिग्दर्शक 
रिमेकचे अधिकार रिलायन्स एंटरटेनमेंटकडे आहेत. त्यांचे सीईओ शिबाशीष सरकारने सांगितले..., या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करतील. याची तयारी जोरात सुरू आहे. आम्ही योग्य वेळी सर्व डिटेल्स शेअर करू. दुसरीकडे नीरज पांडे म्हणाले, चित्रपटाचे या काम वर्षा अखेरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कारण नीरज पुढच्या दोन ते तीन महिन्यात आपल्या वेब शो द एजन्सीमध्ये व्यग्र आहे. यानंतर तो अजय देवगणच्या चाणक्य चित्रपटावर काम सुरू करणार आहे. 


शाहरुख का करू शकतो चित्रपट 
- तज्ज्ञांच्या मते, शाहरुखने जर या चित्रपटात अँटी हीरोची भूमिका केली तर तो नक्कीच हिट होईल. त्याने बऱ्याच दिवसांपासून अँटी हीरोची भूमिका केली नाही. त्यामुळे विक्रम वेधाच्या रिमेकसाठी तो होकार देऊ शकतो. 
- सध्या हॉलीवूड आणि युरोप तसेच साऊथचे अडेप्टेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. शाहरुखच्या बॅनर खाली बनलेला स्पॅनिश थ्रिलर चित्रपट बदला हिट ठरला होता. 
फ्लॅशबॅक 


शाहरुखला करायची होती विक्रमची भूमिका 
शाहरुख यापूर्वी 'बाजीगर', 'राम जाने', 'अंजाम' आणि 'डुप्लीकेट' सारख्या चित्रपटात अँटी-व्हिलनच्या भूमिकेत दिसला आहे. त्यामुळेच निर्मात्यांनी त्याला या भूमिकेसाठी अॅप्रोच केले होते, मात्र शाहरुखला चित्रपटात विक्रमची भूमिका आवडली होती. त्यामुळे त्याने हा चित्रपट सोडला होता. यांनतर ही भूमिका हृतिक रोशन करणार असल्याची चर्चा होती. 


या चार चित्रपटांवरदेखील सुरू आहे शाहरुखच्या नावाची चर्चा 
इन्स्पेक्टर गालिब 

या वर्षांच्या सुरुवातीला मधुर भंडारकरने शाहरुखला वाळू माफियावर आधारित चित्रपटासाठी अप्रोच केले होते. मात्र फायनल समाेर आले नाही. 


डॉन 3 
बऱ्याच दिवसांपासून यावर फक्त चर्चा सुरू आहे. फरहान अख्तरच्या बॅनर खाली बनलेल्या चित्रपटाची फ्रेंचायजी पुढच्या वर्षी येऊ शकते. 
२०१७ मध्ये रिलीज झालेला 'विक्रम वेधा' सुपरहिट ठरला होता. बाहुबली २ नंतर जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. माधवन आणि शाहरुखने नुकतेच झीरोमध्ये सोबत काम केले होते. 


सारे जहां से अच्छा 
अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या चित्रपटासाठीदेखील निर्मात्यांनी शाहरुखला अप्रोच केले होते. मात्र शाहरुख हा चित्रपट करेल की त्याने अजून सांगितले नाही. 


सत्ते पे सत्ता रिमेक 
रोहित शेट्‌टी आणि फराह खान मिळून हा चित्रपट बनवणार आहेत. शाहरुखसोबत दीपिका पदुकोणला घेतले जाऊ शकते.