आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत सोयाबीनला कोंब फुटले; कोट्यवधींचे नुकसान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार एकट्या सोयाबीन पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी खात्याने वतर्वला आहे. आता शेतकऱ्यांनी जगावं कसं असा प्रश्न उभा राहिला आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. भर पावसाळ्यापेक्षाही जोरदार पाऊस पडू लागला आहे. दररोजच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे सोयाबीन पिकाला कोंबे फुटली आहेत. शेतात सुडी करून झाकलेले सोयाबीन उघडे करण्यास वेळ मिळेनासा झाला आहे. दररोजच रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडत आहे. कृषी विभागाच्या नजर पाहणीनुसार जिल्ह्यामध्ये दोन लाख तेरा हजार ७२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिकाचे एक लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले. शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंबे फुटली आहेत. जिल्हा प्रशासनाने ७०७ गावांमध्ये नुकसान झाल्याचे सांगितले. सोयाबीनचे सर्वात जास्त क्षेत्र हिंगोली जिल्ह्यात आहे. कृषी विभागाच्या नजर पाहणी नुसार सोयाबीनचे एक लाख ४० हजार हेक्टरचे नुकसान झाले. जिल्ह्यात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता सरासरी १२ क्विंटल एवढी आहे नुकसानीचा अंदाज व उत्पादकता लक्षात घेता जिल्ह्यात सुमारे सोळा लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पाऊस अद्यापही सुरूच असून पुढील पंधरा ते वीस दिवस शेतात रब्बी पिकाची पेरणी करता येणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रब्बीची पेरणीही लांबणीवर पडणार आहे. २ नोव्हेंबर रोजी पहाटेपर्यंत एकूण सरासरी २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये हिंगोली मंडळात ४० मिलिमीटर, खांबाळा ५०, माळहिवरा २९, सिरसम बुद्रुक सोळा, बासंबा २८, नरसी नामदेव २१, डिग्रस कऱ्हाळे पंधरा, कळमनुरी २९, नांदापूर अठरा, आखाडा बाळापूर ४८, डोंगरकडा दहा, वारंगा फाटा चाळीस, वाकोडी सोळा, सेनगाव सोळा, गोरेगाव ३१, आजेगाव सतरा, साखरा बावीस, पानकनेरगाव आठरा, हत्ता सात, वसमत पाच सहा, गिरगाव नऊ, कुरुंदा सात, टेंभुर्णी पाच, आंबा सोळा, हायातनगर दोन, औंढा नागनाथ ३३, जवळाबाजार दहा, येहळेगाव २५, तर साळणा मंडळामध्ये पस्तीस मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...