आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षणासाठी करावा लागतोय होडीने प्रवास  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
जुई धरणात पाणी आल्यामुळे सुरंगळीतून सुरंगळीवाडी येथे जाण्यासाठी होडीने प्रवास करावा लागत आहे. छाया  : मधुकर सहाने - Divya Marathi
जुई धरणात पाणी आल्यामुळे सुरंगळीतून सुरंगळीवाडी येथे जाण्यासाठी होडीने प्रवास करावा लागत आहे. छाया : मधुकर सहाने

सोयगाव देवी - जुई धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे त्या धरणाचे पाणी दूरपर्यंत आल्यामुळे सुरंगळी ते सुरंगळी वाडीचा रस्ता बंद झाला आहे. या गावातील विद्यार्थ्यांना दोन महिन्यांपासून भोकरदन तालुक्यातील काशी विश्वेश्वर विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन दोन किलोमीटर होडीने प्रवास करून दररोज शिक्षण घ्यावे लागत आहे. 

१८ नोव्हेंबरपासून शाळेत प्रथम सत्र परीक्षा सुरू झालेल्या अाहेत. विद्यार्थी रोज या धरणातून होडीतून प्रवास सुरंगळी येथील काशी विश्वेश्वर विद्यालयात जावे लागत आहे. ५ वी ते ९ वीचे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत आहेत. या प्रवासात मुला-मुलींना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यास जावे लागत आहे. शिक्षक व कर्मचारी हे विद्यार्थ्यांसोबत होडीतून घरी सोडण्यासाठी मदत करतात. यावेळी मुख्याध्यापक ए .एन. सपकाळ, सय्यद एफ. एस., ए. जी. जोगस, एन. एस. येवले, डी. सी. शिरसाठ, ए. जी. गावित, व्ही. ए. राऊत यांनी प्रवास करून विद्यार्थ्यांना धीर देऊन विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. 

शिरसाठ यांनी विशेष असे मार्गदर्शन केले. मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. साक्षी दांडगे, स्वाती दांडगे, सपना दांडगे, संध्या गवळी, पूनम दांडगे, सागर दांडगे यांच्यासह आदी १५ विद्यार्थिनी दररोज होडीने प्रवास करून शिक्षण घेत आहेत. धोकादायक प्रवासाचा दररोज अनुभव घेत असल्याचे शिक्षक दिवाकर सिरसाठ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...