आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयुझ यानाचे रॉकेट बुस्टर झाले फेल; दाेन्ही अंतराळवीर बचावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को- अमेरिका व रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झालेले सोयुझ एमस-१० या रॉकेटच्या बुस्टरमध्ये निम्म्या प्रवासात बिघाड झाला. यानंतर अंतराळवीरांनी सोयुझचे आणीबाणीच्या स्थितीत लँडिंग केले. यानातील दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आहेत.


सोयुझ यान कझाकिस्तानच्या बैकानूर कॉस्मोड्रोम येथून गुरुवारी अांतराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले होते. नासाने टि्वटवर दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात सोयुझ रॉकेट बुस्टरमध्ये बिघाड असल्याचे स्पष्ट झाले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चार हेलिकॉप्टरमधून शोधपथक यानाच्या शोधासाठी रवाना करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...