आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sp Bsp Workers In Camping Outside Strong Room Monitoring Evms With Cameras And Telescopes

Mission EVM! ईव्हीएमवर नजर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी स्ट्राँग रुमबाहेर ठोकला तंबू, दूर्बीण-कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टेहळणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर केले जाणार आहेत. परंतु, ईव्हीएममध्ये कथित घोळ होण्याच्या भीतीने विरोधकांची झोप उडाली आहे. एवढेच नव्हे, तर विरोधक चक्क स्ट्राँग रुमबाहेर तळ ठोकून बसले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी तंबू ठोकला. एका प्रसिद्ध हिंदी माध्यमाच्या वृत्तानुसार, यातून चक्क दूर्बीण, कॅमेरे आणि स्क्रीन्सच्या माध्यमातून ईव्हीएमवर नजर ठेवली जात आहे. ईव्हीएम रुममध्ये कोण येत आहेत आणि ते जाताना कसे जातात यावर कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. निवडणूक आयोगाने मात्र, विरोधकांचे सर्वच आरोप फेटाळून लावले. तसेच प्रत्येक स्ट्राँग रुमबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त असल्याचा दावा केला.


निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात आलेल्या मशीन बदलून त्या ठिकाणी नवीन मशीन ठेवल्या जात आहेत असा आरोप विरोधकांनी केला. यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर पाठवल्या जाणाऱ्या या व्हिडिओंमध्ये ईव्हीएम हॅकिंग किती सोपी आहे, ईव्हीएम बदलून त्या ठिकाणी कशा नवीन मशीन ठेवल्या जातात किंवा त्यामध्ये बदल कसा केला जातो असे दावे केले जात आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने यात तथ्य नसल्याचे सांगितले. सात टप्प्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होत आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगाने येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी कंट्रोल रुम तयार केले आहेत. निवडणुकीचे निकाल येईपर्यंत 24 तास हे नियंत्रण कक्ष सक्रीय राहणार आहे असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. तरीही समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यावर समाधानी नाही. त्यांचे कार्यकर्ते ईव्हीएम ठेवल्या जाणाऱ्या रुम परिसरात पहारा देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...