आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मूमध्ये एसपीओ खुशबू यांची हत्या, 3 वर्षापूर्वी जाळले होते घर, आता घातल्या गोळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शोपियां / श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये विशेष महिला पोलिस अधिकारी (एसपीओ) खुशबू जान यांना दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घातल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान खुशबू यांचा मृत्यू झाला. खुशबू (२१) २०१६ मध्ये एसपीओ झाल्या होत्या. त्या एसपीओ होण्यामागची कथा शौर्य आणि संघर्षाने भरलेली आहे. 


सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचे पोस्टर बॉय बुरहान वानीला चकमकीत ठार मारले होते. त्या काळात जमावाकडून सुरक्षा दलावर हल्ले करण्यात येत होते. तेव्हा खुशबूच्या वेहिल गावात सुरक्षा दलाचा कॅम्प त्यांच्या घराजवळच होता. पोलिस व सीआरपीएफच्या जवानांना त्यांच्या घरातील माणसे चहा-पाणी देत असत. या कारणामुळेच जमावाने त्यांच्या घरावर हल्ला चढवला आणि घराला आग लावली. त्यानंतर तिच्या घरच्यांना पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. त्यानंतरच खुशबू एसपीओ झाल्या होत्या. त्यांची कारकीर्द खूपच गाजलेली होती. धाडसाने त्यांनी दहशतवाद्यांचा मुकाबला केला. 


दुचाकीवरून आले होते तीन हल्लेखोर 
पोलिस आणि खुशबू यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी २.४० वाजता तीन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी आपले चेहरे रुमालाने झाकलेले होते. त्यांनी घरातून बाहेर पडत असलेल्या खुशबूवर गोळीबार केला. जखमी खुशबू यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी एसपीओ आणि पोलिसांनी नोकरी सोडण्याची अथवा त्याचे परिणाम भोगा, अशी धमकी देत होते. 
 

बातम्या आणखी आहेत...