आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार रमा देवी यांच्याबद्दल आजम खान यांनी केले वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- 'मला तुम्ही खूप आवडता, तुमच्या डोळ्यात पाहावसं वाटत...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेत चर्चेदरम्यान सपा खासदार आजम खान यांनी आज(गुरुवार) भाजपा खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. चर्चेदरम्यान शिवहर(बिहार)येथील खासदार रमा देवी पिठासीन अधिकारी अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्या होत्या तेव्हा आजम म्हणाले- "मला तुम्ही इतक्या आवडता की, माझे मन करते सारखे तुमच्या डोळ्यात पाहावे." यानंतर भाजपच्या खासदारांनी सभागृहात एकच गोंधळ केला. आजम यांच्या या वक्तव्यावर रमा देवी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत, मर्यादेत राहून बोलण्यास सांगितले.


लोकसभेत ट्रिपल तलाकवर चर्चा सुरु असताना समाजवादी पक्षाच्या वतीने आजम खान यांना संधी देण्यात आली होती. आजम खान यांनी तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, असे म्हणत सावरण्याचाही प्रयत्न केला. पण केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी या वक्तव्याचा निषेध करत माफीची मागणी केली. विशेष म्हणजे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आजम खान यांचे समर्थन केले. आजम खान यांचा लोकसभा अध्यक्षांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, हे भाजपवालेच उद्धट आहेत, असे अखिलेश यादव म्हणाले.

 

आजम खान यांनी बेताल वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रतिस्पर्धी उमेदवार जयाप्रदा यांच्यावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.