आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Space : NASA's Rover Will Find Traces Of Ancient Life On Mars, 23 Cameras Fitted In It

मंगळावर मानवी जीवन शोधणार नासाचा रोव्हर, जुलै 2020 मध्ये होणार प्रक्षेपण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोव्हरची निर्मिती कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथील जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत केली
  • जुलै 2020 मध्ये फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलहून होणार रोव्हरचे प्रक्षेपण

लॉस अँजेलस - अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासा पुढील वर्षी मंगळ ग्रहावर रोव्हर पाठवणार आहे. हा रोव्हर मंगळावरील प्राचीन जीवनाचे पुरावे शोधण्यासोबत भविष्यातील मानव मोहिमांचा मार्ग सुकर करणार आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी रोव्हरचे अनावरण करताना ही माहिती दिली. रोव्हर कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथील जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेच्या मोठ्या कक्षात तयार करण्यात आले आहे. त्याच्या ड्रायव्हर डिव्हाइसची येथे मागील आठवड्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली. या रोव्हर जुलै 2020 मध्ये फ्लोरिडाच्या केप कॅनावेरल येथून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासह मंगळावर उतरणारा हा पाचवा अमेरिकन रोव्हर होईल.
 

हा रोव्हर मंगळावर शोधणार जीवन


मोहिमेचे उपप्रमुख मॅट वॅलेस यांनी सांगितले की, मंगळावरील मानवी जीवनाच्या अस्तित्वाची माहिती मिळवण्यासाठी रोव्हरला डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे रोव्हरसोबत आम्ही विविध प्रकारचे उपकरण पाठवत आहोत. या उपकरणांद्वारे मंगळाच्या पृष्ठभागावरील भौगोलिक आणि रासायनिक संदर्भ समजण्यास मदत होईल. रोव्हरवर 23 कॅमेरे आणि दोन श्रवण यंत्र लावण्यात आले आहेत. श्रवण यंत्रांद्वारे मंगळावरील हवा ऐकण्यास मदत होईल आणि रासायनिक विश्लेषणासाठी लेझर लावण्यात आले आहेत.