Home | Khabrein Jara Hat Ke | Spain government bans indicent public behavior on tourist places, warns strict action

स्पेनच्या रस्त्यावर रोजचाच झाला होता असा नजारा, आता सरकारला घ्यावा लागला कठोर निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 10, 2019, 02:16 PM IST

खुलेआम अश्लील चाळे आणि अॅडल्ट पार्ट्या रोखण्याचा उपाय...

  • Spain government bans indicent public behavior on tourist places, warns strict action

    स्पेनच्या मेजोरका आणि इबीझा बीच परिसरात सर्वांसमोर अश्लील चाळे रोजचीच गोष्ट बनली होती. भर रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणी दारुच्या नशेत राडा करताना दिसून येतात. नशेत तर्र असतानाच त्यांचे अश्लील चाळे आणि खुलेआम सेक्स करताना फोटो आणि व्हिडिओ देशाचे कुप्रसिद्धी करत होते. या सर्वच गोष्टींना आळा घालण्यासाठी आता स्पेन सरकारने नव्या 64 नियमांची यादीच जारी केली. सोबतच, पोलिस आणि प्रशासनाला त्यांच्या कठोर अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे, देशातील पर्यटन स्थळांची अश्लील प्रतिमा पुसून काढली जाणार आहे असे सरकारने ठरवले आहे.

    जगभरात हे दोन्ही बीच नाइटलाइफ आणि अॅडल्ट पार्ट्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. अशात सामान्य पर्यटकांची गर्दी सुद्धा कमी होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे, प्रतिमा सुधारण्याच्या दिशेने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. बेलारिकचे टूरिझ्म चीफ बिल बार्सेलो यांनी सांगितल्याप्रमाणे, नियमांना लागू करण्यासाठी प्रशानाकडून प्रयत्न सुरूच आहेत. सोबतच, लोकांना यांची माहिती करून देण्यासाठी कॅम्पेन देखील केले जात आहेत. यापुढे सार्वजनिक ठिकाणी असामाजिक कृत्य आणि अश्लील चाळे खपवून घेतले जाणार नाहीत.

Trending