आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 फूट उंचीच्या लाटा उसळल्या, पाऊस-बर्फवृष्टीही, नागरी वसाहतींना बसला वादळाचा फटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद : स्पेनला नैसर्गिक संकटाचा दुहेरी फटका बसला आहे. एकीकडे बर्फवृष्टी आणि वादळाचा नागरी वसाहतींना तडाखा बसला आहे. माणसांनी उंबरे सोडले असून सागरी पुराने मानवी वस्तीत थैमान घातले आहे. ग्लोरिया नावाच्या वादळामुळे ९ प्रांतांत प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. ग्लोरियाने पूर्व सीमा भागात हाहाकार उडवला. पुरामुळे देशातील सर्वात लांब नदी एब्रोचे पाणीही मानवी वसाहतीत घुसले आहे. पुरामुळे भात पिकाची हानी झाली आहे. चोवीस तासांत ७ इंचाहून जास्त पाऊस झाला आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेला मॅलार्का बेट उद्ध्वस्त झाले आहे. त्याशिवाय विविध घटनांत ५ जणांचा मृत्यू झाला. आगामी ७२ तास स्पेनला जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार चोवीस तासांत पावसाचा अंदाज आहे.

८ इंच बर्फवृष्टी, २०० हून जास्त उड्डाणे, फ्रान्सच्या दिशेने वादळाची वाटचाल

ग्लोरियामुळे म्युर्सियामध्ये ८ इंच बर्फवृष्टी झाली. एलिकेंट एल्च विमानतळ बंद झाल्यामुळे २०० हून जास्त उड्डाणे रद्द झाली. संपूर्ण स्पेनमध्ये २ लाखांहून जास्त घरांतील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळाने आता फ्रान्सकडे मार्गक्रमण केले.

सलग तिसऱ्या दिवशी वादळ

छायाचित्र बार्सिलोनाच्या किनाऱ्यावरील आहे. सलग तिसऱ्या दिवशीही वादळी स्थिती होती. व्हेलेन्सिया व बार्सिलोना किनारी सुमारे ५० फूट उंच लाटा उसळत होत्या.

 

बातम्या आणखी आहेत...