आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेन : युवकाने लेगो विटांपासून स्वत:साठी कृत्रिम हात बनवला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- स्पेनमध्ये बायो-इंजिनिअरींगचा विद्यार्थी डेव्हीड अगिलर (१९) याने लेगो विटांपासून स्वत:साठी कृत्रिम हाथ बनवला आहे. अनुवंशीक कारणामुळे डेव्हीडला जन्मापासून डावा हात नाही. मित्रांनी लेगो विटा आणून दिल्यानंतर जवळपास एका वर्षात मी रोबोटिक हात बनवल्याचे डेव्हीड सांगतो. इलेक्ट्रीक मोटारचा वापर करून सांध्यापासून हाताची हालचाल करता येते. तसेच विविध वस्तू पकडता येतात. 

 

बालपणी इतर मुलांपेक्षा वेगळा असल्याने मी खूप निराश व्हायचो; पण स्वप्न पाहणे मी कधी थांबवले नाही आणि अखेर हात बनवल्याचे त्याने सांगितले. दिव्यांग व्यक्तींना प्रेरीत करण्यासाठी 'हँड सोलो' नावाचे यू-ट्यूब चॅनल तो चालवतो. काहीही अशक्य नाही, हे सांगणे या चॅनलचे उद्दिष्ट आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...