आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरचा दावा : पुन्हा एकदा अशी महामारी येणार ज्यामुळे जाईल कोट्यवधी लोकांचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - जवळपास एका शतकापूर्वी म्हणजे 1918 मध्ये अशी भयंकर महामारी पसली होती, ज्यात जगभरातील जवळपास 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी लोकांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला होता. आता एका डॉक्टरने पुन्हा एकदा महामारीबाबत धक्कादायक दावा केला आहे. ब्रिटनचे डॉक्टर फारी अहमद यांनी दावा केला की, लवकरच महामारी पसरणार असून त्यामुळे एकच गोंधळ उडणार आहे. 


एका न्यूज चॅनलने डॉक्टर फारी अहमद यांना विचारले की, 1918 सारखी महामारी पुन्हा पसरू शकते का? यावर ते म्हणाले, नक्कीच जर तुम्हाला वाटत अशेल की तुमच्याकडे नवीन औषधे आणि लसी आहेत आणि त्यामुळे स्पॅनिश फ्लूसारखा महारोग पुन्हा पसरणार नाही तर तुम्ही चूक आहात. कारण ही महामारी पुन्हा पसरू शकते. 


शास्त्त्रज्ञही म्हणाले हा मोठा धोका 
डॉक्टर फारी अहमद यांच्यानंतर ग्लोबल हेल्थ काऊंसिलचे डॉ. जोनाथन क्विक यांनी इशारा देत म्हटले की, इन्फ्लुएंजा व्हायरसमध्ये होत असलेले बदल आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. फ्लू सारखा हेल्थ क्रायसिस धोकादायक असण्याचे आणखी एक कारण म्हणजे हा एवढ्या वेगाने पसरतो की त्याची कल्पनाही करता येणार नाही. याचा निपटारा करण्याचा विचार करेपर्यंत हा लाखो लोकांपर्यंत पोहोचलेला असेल. 


1918 मध्ये जगभरात पसरला 
पहिल्या महायुद्धाच्या काळात सर्वात आधी अमेरिकेच्या कंसासमध्ये एक अमेरिकन सैनिक अल्बर्ट गिट्चेलमध्ये याची लक्षणे आढळली होती. लवकरच ही महामारी अमेरिकेसह फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनपर्यंत पसरली. विशेषतः स्पेनमध्ये त्याच्या प्रकोपाबाबत जगभरात चर्चा झाली. त्याठिकाणी तत्कालीन सासक किंग अल्फान्सो (तेरावें) यांनादेखिल याची लागण झाली होती. त्यामुळेच या महामारीला 'स्पॅनिश फ्लू' नावाने ओळखले जाते. एका रिपोर्टनुसार या महामारीमुळे 5 ते 7 कोटी लोकांचा जीव गेला होता. त्यावेळच्या लोकसंख्येच्या 3 ते 5 टक्के एवढा हा आकडा होता. 


घातक व्हायरस होते कारण 
या महामारीमागे एक घातक व्हायरस होता. हा व्हायरस एच1एन1 इन्फ्लुएंजा व्हायरस असल्याचे समोर आले होते. सध्याच्या काळात जो स्वाइन फ्लू पसरत असतो तोही याच व्हायरसचा छोटासा प्रकार आहे.  

बातम्या आणखी आहेत...