आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतुलनाबद्दल सांगत असताना शूजमुळे खाली कोसळल्या ओप्रा विन्फ्रे, म्हणाल्या - हेदेखील सुखद होते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजेलिस : टॉक शोच्या होस्ट, प्रोड्यूसर आणि परोपकारी कार्य करणाऱ्या ओप्रा विन्फ्रे आपल्या मोटिव्हेशनल टूरदरम्यान संबोधित करताना स्टेजवर खाली कोसळल्या. विन्फ्रे जेव्हा संतुलनाविषयी सांगत होत्या, तेव्हाच त्यांचे संतुलन बिघडले आणि त्या खाली पडल्या. 66 वर्षांच्या विन्फ्रे म्हणत होत्या. ‘माझ्यासाठी तंदुरुस्तीचा अर्थ आहे सर्व गोष्टी संतुलित असणे आणि संतुलनाचा अर्थ हा नाही की, सर्व सर्व गोष्टी बरोबर असाव्यात.’

यानंतर त्या अडखळला आणि खाली पडल्या. उठल्यानंतर त्या केवळ एवढेच म्हणाल्या, ‘चुकीचे शूज !’ त्यानंतर त्यांनी आपले शूज काढले आणि म्हणाल्या, “संतुलनाविषयी सांगत असताना खाली पडणे, सुखद होते.’ ओप्रा आपला टूर ‘2020 व्हिजन : यूअर लाइफ ऑन फोकस टूर’ वर आहेत. जो 7 मार्चला कोलोराडोच्या डेनवरमध्ये संपणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...