आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर न मिळणाऱ्या अद्भुत कलाकृतींची प्रतीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोरंजन क्षेत्रात आगामी वर्षात असंख्य बदल होतील. पण ते कशा प्रकारचे असतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्याच्या वेब सिरीजवर बंधने नसल्याने त्या आवडीने पाहिल्या जात आहेत. त्यामुळे केवळ ‘टॅबू’ म्हणून टाळण्यात आलेले सर्व विषय आता पडद्यावर पाहायला मिळतील. त्यामुळे सिनेमामध्ये आता नवे प्रयोग होतील. एवढे दिवस जे विषय पडद्यावर मांडण्यासाठी लोक घाबरत असत, ते विषय अनेक माध्यमांतून सहजपणे हाताळले जातील. विषयांमध्ये नावीन्य येईल.गेम ऑफ थ्रोन्स जगभराने पसंत केले. त्या एका सिरीजमुळे पाश्चिमेकडील चित्रपटाचे स्वरूपच बदलले.  

 

सेलफोनवर उपलब्ध होणाऱ्या कंटेंटमुळे सिनेमाला थेट आव्हान मिळत आहे. या वर्षी कमी बजेटचे आणि दर्जाहीन कथा असलेले चित्रपट चालू शकले नाहीत. पाश्चिमात्य निर्मात्यांवर लॅव्हिश सिनेमा दाखवण्याचा तसेच वेगळ्या धाटणीची पटकथा आणण्याचा दबाव दिसून आला. आता तर मोबाइलवर उपलब्ध होणारे मनोरंजनच टिकेल. टेलिव्हिजन अजूनच अप्रासंगिक होतील. पुढील वर्षी तर कमी बजेटचे चित्रपट चालणारच नाहीत. पुढील वर्षी जास्त बजेटचे अनेक चित्रपट येतील. सरत्या वर्षात कमी बजेटचे चित्रपट आले. पण मोठ्या बजेटच्या तुलनेत ही संख्या खूप कमी होती. कमी बजेटचे चित्रपट चाललेच नाहीत. काही चालतात, त्यामुळे कधी कधी अशा चित्रपटांकडूनदेखील मोठ्या अपेक्षा केल्या जातात. पण आता ते प्रत्यक्षात उतरणे शक्य नाही. त्यामुळे पुढील वर्षात प्रामुख्याने बिग बजेट चित्रपट येतील. त्यांचे बजेट आपल्या कल्पनेच्याही पलिकडचे म्हणजेच १०० कोटी ते २०० कोटींच्या घरात असेल. आता एवढ्या मोठ्या गुंतवणुकीतून आपल्याला पडद्यासमोर कोणता मोठा अनुभव मिळेल, हे पुढील वर्षाच स्पष्ट होईलच. 
 
केबलपूर्वी दूरदर्शन होते. नंतर सॅटेलाइट चॅनल आले. तोपर्यंत मालिकांमध्ये शहरी जीवन होते. पण केबल जस-जसे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले, कंटेंटमध्ये गाव-खेड्यातील जीवन दिसू लागले. त्याला रिअॅलिझम म्हणतात. हे रिअॅलिझम अनेक मालिकांमधून दिसू लागले.आता तर चित्रपटांमध्येही हे चित्र जास्त दाखवले जात आहे. आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हाती टेलिफोन आला. त्यामुळे काका-काकू, मामा-मामी, आत्या, प्रत्येक घर, गल्ली, शेत, नद्या, विहिरी जेथे जेथे संधी मिळेल, तेथील चित्र फोनवरून टिपले जाते. मनोरंजन अधिकाधिक वैयक्तिक होत जाईल.  

 

अॅमेझॉन, नेटफ्लिक्स अगदी चाहत्यांच्या मनाजोगे कंटेंट देत आहेत. ‘सेक्रेड गेम’ हिंदीमध्ये असून जगाच्या काना-कोपऱ्यात गेले. त्यामुळे भाषांची बंधने गळून पडली आहेत. नैतिक-अनैतिकतेच्या धारणाही आता मोडकळीत निघत आहेत. सेन्सॉर बोर्ड किंवा पुस्तकांत आढळणाऱ्या समाज रचनेच्या सूचना, मर्यादाही धूसर होतील. अनैतिक गोष्टी टेलिव्हिजनवर दाखवू नये, हा नियमच सरत्या वर्षात बाजूला सारला गेला. कारण अनैतिक विषयच जास्त पसंत केले गेले. हिंसेची विद्रूपता, बीभत्सपणा टाळण्याचा प्रयत्न केला गेला. पण आता त्याचे नवे-नवे चेहरे समोर येत आहेत. त्यामुळे वेब सिरीजवर सेन्सॉर लावण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याकडील लोकांना बंदी घालायला खूप आवडते. प्रत्येक गोष्टीवर प्रतिबंध! 

 

इंटरनेट, स्मार्टफोन आणि वेब सीरिजच्या जमान्यात चित्रपटांना अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अद्भुत स्वरूप धारण करावे लागेल. प्रेक्षकांना फोन व टेलिव्हिजनवर न मिळणारे मनोरंजन चित्रपटगृहांमध्ये द्यावे लागेल. अगदी साधी गोष्ट आहे, दोन तासांच्या सिनेमासाठी मला दोन तास ज्यादा द्यावे लागतात. थिएटरपर्यंत जाणे, बाइक-कार पार्किंग इत्यादींसाठीही वेळ द्यावा लागतो. त्याऐवजी फोन, टॅब्लेट, लॅपटॉपवर सिनेमा पाहिल्याने वेळ वाचतो. आता तर हे मोफतच मिळत आहे. पण नंतर यासाठीही पैसे मोजावे लागतील.  
शब्दांकन : अमित कर्ण

बातम्या आणखी आहेत...