आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​रणबीरच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने बनवला स्पेशल केक, व्हिडिओ होत आहे खूप व्हायरल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : रणबीर कपूरने 28 सप्टेंबरला आपल्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी पोहोचले होते आणि रणबीर कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या पार्टीचे आयोजन आलियाने रणबीरची आई नीतू कपूर यांच्यासोबत मिळून केले होते. यादरम्यान आलियाने विशेष तयारी केली होती. आता तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

झाले असे की, आलियाने स्वतः रणबीरसाठी त्याचा आवडता पायनॅप्पल फ्लेवर्ड केक बनवला होता. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, आलिया किचनमध्ये आहे आणि केक बनवत आहे. मात्र ती ज्या पद्धतीने कुकिंग करत आहे त्यावर तिथे उपस्थित असलेले सर्वच लोक आणि ती स्वतः देखील हसत आहे.