आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यघटना हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे; घटनेची निर्मिती, लवचिकता, कलात्मकता याविषयीची विशेष माहिती... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी स्पेशल- २६ जानेवारी १९५० रोजी भारतात राज्यघटना अमलात आली. हा स्वागत सोहळा ऐतिहासिक असाच ठरला. या सोहळ्याची तालीम ७ जानेवारीपासूनच सुरू झाली होती. भारत प्रजासत्ताक देश घोषित झाल्याच्या दिवशी आणखी काय-काय घडले त्याचा तपशील...

 

२ वर्षे, ११ महिने, १७ दिवसांत बनले संविधान
> १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात राज्यघटना अमलात येण्यास अडीच वर्षे लागली. २ वर्ष, ११ महिने, १७ दिवसांत जगातील सर्वात मोठे संविधान आकारास आले.
> २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली. या दिवशी ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीताचा आणि ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगानाचा दर्जा मिळाला.
> भारतीय राज्यघटनेवर २४ जानेवारी १९५० रोजी घटना सभेच्या २८४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यापैकी १५ महिला होत्या. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेसाठी अमेरिकी घटना प्रेरक ठरली. दोन्हींची सुरुवात ‘वी द पीपल’ने होते. आमच्या प्रस्तावनेत स्वातंत्र्य, समानता, बंधुभावाचा आदर्श फ्रेंच क्रांतीपासून घेण्यात आला.
> २६ जानेवारी १९५५ ला पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहंमद प्रजासत्ताक दिनाचे विशेष पाहुणे होते. नवी दिल्लीतील राजपथाची यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी कायमस्वरूपी निवड करण्यात आली.
> १९५० आणि १९५४ दरम्यान भारतात प्रजासत्ताक दिन समारंभासाठी स्थान निश्चित नव्हते. प्रारंभी लाल किल्ला, नॅशनल स्टेडियम, किंग्स-वे कॅम्प आणि रामलीला मैदानावर त्याचे आयोजन होत असे.


सकाळी १० . १८ ला प्रजासत्ताकाची घोषणा, ६ मिनिटांत ठरले राष्ट्रपती
पहिल्यांदा याच दिवशी ब्रिटिश व्हॉइसरॉयच्या मुकुटाच्या जागेवर  अशोकस्तंभ राष्ट्रीय चिन्हाच्या रूपात ठेवण्यात आला. २६ जानेवारी १९५०. पहाटेच्या कडाक्याच्या गारव्यात गव्हर्नमेंट हाऊस (विद्यमान राष्ट्रपती भवन) रोषणाईने लखलखत होते. अवघ्या काही तासांनंतर होऊ जाणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याची ही तयारी होती. अखेर सकाळी १० वाजता गव्हर्नमेंट हाऊसमध्ये काही देशांचे  राजनयिक आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांच्यासह ५०० पेक्षाही अधिक पाहुणे पोहोचले होते. या सर्वांच्या उपस्थितीत अखेरचे गव्हर्नर सी. राजगोपालाचारी म्हणाले, ‘इंडिया, अर्थात भारत आता सार्वभाैम लोकशाहीवादी प्रजासत्ताक राष्ट्र असेल.’ ही प्रजासत्ताकाची औपचारिक घोषणा होती. त्या वेळी सकाळचे १० वाजून १८ मिनिटे झाली होती. 

 

४ फेब्रुवारी १९५० रोजी फाैजी अखबार (आताचा सैनिक समाचार) मधील लेखानुसार या घोषणेनंतर सहाच मिनिटांत डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्या राष्ट्रपतींच्या रूपात शपथ घेतली. भारताचे मुख्य न्यायाधीश हिरालाल कानिया यांनी हिंदीत शपथ देवविली. त्यानंतर गांधी टोपी घातलेले डॉ. प्रसाद यांनी पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर इंग्रजीत भाषण केले. या भाषणात म. गांधींचा त्याग आणि बलिदानाचा उल्लेख होता. भाषण आटोपताच पं. नेहरू उठले आणि सरदार पटेल यांच्याशी हस्तांदोलन केले. या दोघांनीही डॉ. प्रसाद यांना शुभेच्छा दिल्या.

 

त्यानंतर पं. नेहरूंनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसह शपथ घेतली. या दरम्यान हॉलमध्ये ५०० पेक्षाही अधिक लोक हजर होते. परंतु गव्हर्नमेंट हाऊसच्या आसपास हजारोंच्या संख्येने लोक गोळा झाले होते. डॉ. प्रसाद यांच्यासह सारे लोक राजघाटावर गेले, त्यांनी म. गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी डॉ. प्रसाद यांचा संदेश ऐकण्यासाठी आयर्विन अॅम्फिथिएटर (विद्यमान मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम) वर १५ हजार पेक्षाही अधिक लोक पोहोचले होते. त्या वेळी हेच संचलनस्थळ होते. राष्ट्रपतींनी येथे तिरंगा फडकावला आणि ३ हजार सैनिकांची सलामी स्वीकारली. त्यानंतर संस्मरणीय भाषण केले. 

 

या वेळी डॉ. प्रसाद म्हणाले, ‘आमच्या प्रदीर्घ इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे की, काश्मीर ते कन्याकुमारी आणि काठियावाड, कच्छपासून काकिनाडा-कामरूपपर्यंत हा देश राज्यघटना आणि एका संघराज्याच्या रूपात अस्तित्वात आला आहे. दोन तास चाललेल्या सोहळ्यानंतर रात्री राष्ट्रपती भवनात पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंदिरा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार बलदेव सिंह आणि कपूरथळाच्या राजकुमारी अमृत कौरदेखील सामील होत्या.

 

घटनेचे सुरक्षाकवच! नायट्रोजन चेंबरमध्ये मूळ प्रत सुरक्षित, दरवर्षी तपासणी 
जगात फक्त भारताची राज्यघटनाच हाताने बनवलेल्या कागदांवर हाताने लिहिलेली आहे. २३३ पानांच्या घटनेच्या मूळ प्रतीत विविध कलाकृतीही पाहायला मिळतात. प्रत्येक पानावर सोनेरी पानांची फ्रेम आहे. संविधानाची मूळ प्रत पूर्वी जाड पांढऱ्या कपड्यात डांबरी गोळ्या टाकून गुंडाळून ठेवलेली होती. ९० च्या दशकात संसद भवनाच्या वाचनालयात ती शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या एका चेंबरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. त्यापूर्वी जगातील इतर देशांच्या राज्यघटना कशा प्रकारे सुरक्षित ठेवल्या आहेत, याचा अभ्यास केला गेला. अमेरिकेची घटना सर्वाधिक सुरक्षित असल्याचे कळले. लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये हेलियम वायूच्या चेंबरमध्ये ती एक पानाची घटना ठेवलेली आहे. त्यानंतर अमेरिकेच्या गेट्टी इन्स्टिट्यूट, भारतातील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी व भारतीय संसदेदरम्यान करार होऊन गॅस चेंबर बनवण्याची योजना अस्तित्वात आली. भारतीय घटनेचा आकार सर्वात मोठा असल्याने हे चेंबर मोठे आहे. यात हेलियम वायू कैद करण्याचे अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर नायट्रोजनचे चेंबर तयार करण्यात आले. कागदांच्या सुरक्षेसाठी निरुपद्रवी वायूची गरज होती. त्यामुळे नायट्रोजनची निवड झाली. भारतीय घटना काळ्या अक्षरांत असल्याने ती शाई सहज उडून जाऊ शकते. पण ती सुरक्षित ठेवण्यासाठी आर्द्रता ५० ग्राम प्रति घनमीटर ठेवणे आवश्यक होते. हे लक्षात घेता हवाबंद चेंबर तयार करण्यात आले. आर्द्रतेचे नियोजित प्रमाण राखण्यासाठी चेंबरमध्ये गॅस मॉनिटर लावले गेले. 

 

हे चेंबर तयार झाले तेव्हाच्या लोकसभा सचिवालयातील अतिरिक्त 
सचिव राहिलेले डॉ. रविंदर कुमार चड्ढा यांनी सांगितले की, दरवर्षी चेंबरमधील नायट्रोजन वायू काढून घटनेची तपासणी केली जाते. दर दोन महिन्यांनी चेंबरची तपासणी होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे घटनेवर देखरेख ठेवली जाते.
 

 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser