आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी खूपच हट्टी, नकार ऐकू शकत नाही, बदल असाच तर होईल...: फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन केवळ ३४ वर्षांच्या आहेत. एवढ्या कमी वयात पंतप्रधान होणाऱ्या त्या जगातील एकमेव महिला आहेत. १९ सदस्यांच्या त्यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची १२ खाती महिलांकडे आहेत. त्यांच्याकडे ‘महिला पंतप्रधान’ म्हणून बघणे त्यांना आवडत नाही. त्या म्हणतात, लैंगिक-धार्मिक भेदभाव मानवतेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे.

अमेरिकेतील भास्करचे प्रतिनिधी सिद्धार्थ राजहंस यांनी फिनलंडला जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, वाचा सना मरीन यांच्याच शब्दांत...


मला वाटते की, नेतृत्वाचे महिला किंवा पुरुष असण्याशी काही देणेघेणे नाही. फिनलंडचे नेेतृत्व एका महिलेकडे असल्याचे बघून जगाला आश्चर्य वाटते याचेच मला आश्चर्य आणि खेदही आहे. महिलांनी पुढे येणे आणि त्यांनी नेतृत्व करणे यावर हैराण होण्याची काहीच गरज नाही. लिंगभेदाची मानसिकताच बहुधा असे प्रश्न निर्माण करते. माझे वय अाणि मी महिला असणे काही मोठा मुद्दा नाही. मतदारांच्या विश्वासामुळे मी येथे आहे. मुद्दे सोडवण्यासाठी मी येथे आहे. जेव्हा तुम्ही निर्धारित निकष मोडता आणि काहीतरी वेगळे करता तेव्हा साहजिक आहे की, लोक तुमच्याकडे लक्ष द्यायला लागतात. वास्तवात मला वाटते की, जगभरात वयोवृद्ध नेत्यांना तरुण पिढीच्या समस्या जशा वातावरण बदल, नवे उद्योग यांच्याबाबत माहितीच नाही. हा जनरेशन गॅप आहे आणि ते राजकीय पातळीवर आज आणखी व्यापक झाल्याचे दिसते. यामुळे नव्या पिढीने पुढे येत जबाबदारी स्वीकारणे गरजेचे अाहे. याच विचाराने मला राजकारणात येण्याची आणि नेतृत्व स्वीकारण्यासाठी प्रेरणा मिळाली. ज्या मुद्द्यांचा सामना जगाला करावा लागत आहे त्याबाबत महिला स्वाभाविकरीत्या अधिक संवेदनशील आहेत, असे मला वाटते. यामुळेच अधिक चांगले करण्यासाठी आम्ही तयार आहोत. याच कारणामुळे माझ्या मंत्रिमंडळातही महिला मंत्र्यांची संख्या जास्त आहे. माझ्या मंत्रिमंडळासाठी लैंगिक समानता आणि अधिकार खूप महत्त्वाचे आहेत. सुनियोजित पद्धतीने समाजाच्या विचारात बदल करून आणि धोरण बदलून लैंगिक समानता आणता येऊ शकते. उदाहरणार्थ, आजही लोक माझ्याबरोबर पंतप्रधान म्हणून नव्हे, तर ‘महिला पंतप्रधान’ म्हणून बोलतात. यातून समाजाचे विचार कळतात. महिला समान आहेतच. एवढेच नव्हे तर मुद्दे सोडवण्यात जास्त सक्षम आहेत हे आपण का स्वीकारत नाहीत? याबाबतीत फिनलंड आणि भारत एक उदाहरण ठरू शकतील.भारतात ४० वर्षांपेक्षा कमी वयाची लोकसंख्या जास्त आहे. एवढीच भागीदारी महिलांचीही आहे हे नक्की. भारताला आपल्या या युवा लोकसंख्येच्या अनुसार धोरणात बदल करावा लागेल. तेव्हाच लैंगिक किंवा धार्मिक भेदभाव थांबेल. तसेच नव्या युगात काम आणि उत्पादकतेचे मापदंडही बदलत आहेत. उशिरापर्यंत कार्यालयात थांबणे आणि कठोर परिश्रम घेणे विशेष गुण मानला जात आहे हे त्याचे उदाहरण आहे. मात्र, तुमच्या कठोर परिश्रमाचे फलित काय झाले, त्यातून काय मिळाले हे बघण्याची गोष्ट आहे. सध्याच्या काळात तर कमीत कमी इनपुटमध्ये जास्तीत जास्त आउटपुटची गरज आहे. म्हणूनच आम्ही आठवड्यात २४ तास काम करण्याच्या धोरणावर काम सुरू केले आहे. यामुळे लोक कुटुंबाला वेळ देऊ शकतील. काम आणि आयुष्यातील हे संतुलन आमचे पुढचे पाऊल आहे. कुटुंबाला जास्त वेळ द्यावा, असे मलाही वाटते. कामाच्या तासांना मापदंड करणार नाही. आनंद आणि उत्पादकता यांच्यात गहन संबंध असतात. यामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवून राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी लवचिक कार्य संस्कृतीच्या बाजूने मी आहे. मी वस्तुस्थिती स्वीकारते आणि नवा विचार करते. मी कधीच घाबरले नाही. खूप हट्टीदेखील आहे. मी उत्तरात ‘ना’ एेकत नाही. मला वाटते की, चांगले बदल असेच होतात.


भारतात भरपूर वाव आहे. भारतीय संस्कृतीत संपूर्ण जगाला एक कुटुंब मानले जाते. मला ‘वसुधैव कुटुंबकम्’ची कल्पना फारशी माहीत नाही. मात्र, भारतीय मूल्ये आणि संस्कृती आदरास पात्र आहेत. मला वाटते की, भारत केवळ ग्लोबल सुपर पॉवरच नाही, तर तो असमानता आणि वातावरण बदलासारख्या नव्या मुद्द्यांवर जगाचे नेतृत्व करू शकतो.
 शाळांत मानवी जीवनाची शिकवण देण्याची गरज

जर मला शालेय अभ्यासक्रम तयार करण्याची संधी मिळाली तर युवकांसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा त्यात समावेश करेन. अभ्यासक्रमात समान अधिकार आणि त्याची व्यापक व्याख्या व्हायला हवी. जागतिक मुद्दे, आपल्या समाज-संस्कृतीत झालेले परिवर्तन आणि बदलणाऱ्या आर्थिक मुद्द्यांचा समावेश करेन. आपल्या आजूबाजूला होत असलेल्या जलद सामाजिक-आर्थिक बदलांसोबतच आयुष्यातील मानवी बाजू शिकवणे, समजावण्याची सर्वाधिक गरज आहे. कारण ते आधुनिक समाजाचे मजबूत खांब आहेत.
 

माझी मुलगी मला सजग व परिपक्व व्यक्ती बनवते...
 
माझ्या  मुलीचा जन्म माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व सुखाचा क्षण अाहे. मी काम करणारी अाई आहे व अॅमा लहानपणापासूनच ते बघतेय. मला वाटते की, या लहान मुलीने माझ्या काम करण्याच्या आयुष्याच्या हिशेबाने स्वत:ला अनुकूल केले आहे. मी खूपच सामान्य व अपारंपरिक वातावरणात वाढले आहे. महत्त्वाच्या विषयांवर मी लहानपणापासूनच व्यक्त होत आले आहे. आणि एक आईच्या नात्याने मी याच मूल्यांवर चालते. मी माझ्या इन्स्टाग्रामवर बेबी बम्प आणि स्तनपान करणारी छायाचित्रे टाकली आहेत. या सर्व गोष्टी मातृत्वाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि नैसर्गिक बाबी आहेत. आई झाल्याने मी खूप खुश आहे आणि त्या गोष्टीही स्वीकारत आहे, ज्यावर चर्चा करायलाही लोकांना संकोच वाटतो. या प्रकारे माझी मुलगी मला सजग आणि परिपक्व व्यक्ती बनवत आहे. नव्या विचारांमुळेच मी आणि माझे पती मार्क्स मुलीच्या संगोपनात समान जबाबदारी पार पाडतोय. ते खूपच समजूतदार आहेत. त्यांनी अॅमाच्या जन्माच्या वेळी पितृत्वाची सुटी घेऊन एक बेंचमार्क निर्माण केला आहे. शेवटी एका अपत्याबाबत आई- वडील दोघांची समान जबाबदारी आहे. 

बातम्या आणखी आहेत...