आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे वडील मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडले नसते तर येस बँकेची अशी अवस्था झाली नसती : शगुन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येस बँकेचे दिवंगत सहसंस्थापक अशोक कपूर यांच्या मुलीची विशेष मुलाखत
  • शगुनला बोर्डात घेण्यास राणा कपूर यांचा विरोध

गुरुदत्त तिवारी

भाेपाळ - राणा कपूर यांच्यासमवेत येस बँकेची स्थापना करणारे दिवंगत अशोक कपूर यांची मुलगी व प्रदीर्घ कायदेशीर लढा देऊन बँकेच्या बोर्डावर नियुक्ती मिळवणाऱ्या शगुन कपूर गोगिया यांनी सांगितले की, त्यांचे वडील मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेले नसते तर आज बँकेची जी अवस्था झाली आहे. ती तशी झाली नसती. बँकेची मूळ संकल्पना वडिलांची होती, त्यांनी घोटाळा होऊ दिला नसता

> येस बँक आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. ठेवीदार निराश आहेत. आता कोणता पर्याय दिसतो?


माझा व कुटुंबीयांचा बँकेवर अजूनही विश्वास आहे. यामुळे ८.५% समभाग आम्ही विकलेले नाहीत. यातून मार्ग काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. बँकेच्या अॅस्क्रो खात्यात ३६०० कोटी रुपये (५० कोटी डॉलर) आहेत. यामुळे खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. 

> तुमचे वडील असते तर अशी वेळ आली नसती, असे तुम्हाला वाटते ? 


होय. येस बँकेची मूळ संकल्पना माझ्या वडिलांची होती. त्यांनी एनबीएफसीची बँक व त्यानंतर महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचण्यास खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते असते तर बँकेवर ही वेळच आली नसती. 

> तुम्ही २०१९ मध्ये बँकेच्या बोर्डात गेलात. तेव्हा तुमच्याकडे बँकेला ट्रॅकवर आणण्यासाठी काय पर्याय होते? 

बँकेसंदर्भात खूप बातम्या येत होत्या. त्यामुळे बँकेची पत खालावत होती. परिस्थिती इतकी वाईट होईल असे वाटले नव्हते. पण परिस्थिती आधीपेक्षाही खूप वाईट झाली. 

> राणांनी पैसा बाहेर नेला. महागड्या पेंटिंग्ज विकत घेण्यावर पैसे उधळले? 

माझ्या वडिलांनी खूप कष्टाने बँक उभी केली. परंतु तिची आज अशी अवस्था झाली, याचे वाईट वाटते. 
असा सुरू झाला प्रवास

राणा कपूर व अशोक कपूर यांनी १९९८ मध्ये हॉलंडच्या रोबो बँकेसोबत बँकेतर वित्त पुरवठा कंपनी (एनबीएफसी) रोबो इंडिया फायनान्सची स्थापना केली. यात दोघांसमवेत अन्य भागीदार हरकतसिंह यांची २५-२५% भागीदारी होती. २००३ मध्ये तिघांनी रोबो इंडियातील भागीदारी विकली. नंतर राणा आणि अशोक यांनी २०० कोटी रुपयांच्या भांडवलातून येस बँकेची स्थापना केली. दोघांनाही रोबो इंडियातून १०-१० लाख डॉलर मिळाले. येस बँकेने २००४ मध्ये आपली पहिली शाखा मुुंबईत सुरू केली. त्यावेळी बँकिंग क्षेत्रावर सरकारी बँकेचे वर्चस्व होते. तसेच फक्त एचडीएफसी बँक व आयसीआयसीआय बँका होत्या.

अशा सुरू झाल्या अडचणी

२००८ मध्ये अशोक कपूर  बँकेचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन होते. त्यांची बँकेत एकूण १२ टक्क्यांची भागीदारी होती. तेे २६ नोव्हेंबर २००८ रोजी पत्नी मधूसोबत नरिमन पाॅइंटवरील हॉटेल ट्रायडंटमध्ये जेवणासाठी गेले होते. त्याच वेळी हॉटेलमध्ये दहशतवादी शिरले. शगुन यांनी  दैनिक भास्करला सांगितले, त्या दिवशी वडिलांनी फोन करून मला टीव्ही ऑन करण्यास सांगितले. त्यांना हॉटेलमधील हालचालीची माहिती हवी होती. शगुन यांनी पुन्हा कॉल केला. तोपर्यंत वडिलांना बहुतेक दहशतवाद्यांनी ठार केले होते. या गोंधळात मधूची व त्यांची ताटातूट झाली होती. नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मधू यांना सुरक्षित बाहेर काढले.  या हल्ल्यातून सावरल्यानंतर मधू कपूर यांना येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी अशोक यांच्या जागी नियुक्ती देण्याची मागणी केली. परंतु राणा कपूर यांनी नकार दिला. नाइलाजाने त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. दीर्घ कायदेशीर लढा दिल्यानंतर २०१९ मध्ये शगुन यांना बोर्डात स्थान मिळाले. २६ एप्रिल २०१९ रोजी शगुन बँकेच्या अतिरिक्त संचालक झाल्या.