आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज एमअायडीसीला विशेष पोलिस संरक्षण; सरकारकडून गांभीर्याने दखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगाबाद- महाराष्ट्र बंदच्या दिवशी वाळूजमध्ये समाजकंटकांनी धुडगूस घालत सुमारे ७० कंपन्यांवर सशस्त्र हल्ले केले हाेते. मोठ्या प्रमाणात तोडफोड, जाळपोळ करून काेट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकाराची राज्य सरकारकडून गांभीर्याने दखल घेण्यात अाली. साेमवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत संपूर्ण वाळूज औद्योगिक वसाहतीला विशेष पोलिस संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अाला. 


पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद वाळूजमध्ये असताना हा प्रकार झाल्याने उद्योजक चिंताक्रांत झाले होते. पोलिसांनी कायमस्वरूपी तत्काळ संरक्षण द्यावे, अशी मागणी १० ऑगस्टला बैठकीत उद्याेजकांनी केली होती. त्याची दखल घेऊन देसाई यांनी सोमवारी तातडीची बैठक मुंबई येथे घेतली. त्यास सीआयआयचे माजी अध्यक्ष ऋषिकुमार बागला, पाेलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद व इतर उद्योजक उपस्थित होते. बागला यांच्या माहितीनुसार, वाळूज एमअायडीसीत विशेष पोलिस दल नियुक्त करण्यास उद्याेगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही तातडीने होईल, असे आश्वासनही दिले. सध्या हल्लेखोरांवर होत असलेल्या कारवाईची माहितीही उद्याेगमंत्र्यांनी जाणून घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...