आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1947 च्या मुहूर्तानुसार पशुपतीनाथ मंदिरात होतो स्वातंत्र्य दिनाचा अभिषेक, यावेळी विशेष पूजा काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदसौर : शहरातील विश्वप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिरात 1947 च्या मुहूर्तानुसार प्रत्येक वर्षी स्वातंत्र्याचा अभिषेक केला जातो. या तिथीनुसार यावेळी स्वातंत्र्यदिन 10 ऑगस्टला आहे. यामुळे या दिवशी सकाळी 9  वाजता विशेष पूजा केली जाईल.


ज्योतिष कर्मकांड परिषदेनुसार भारताच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे. या दोषाच्या शांतीसाठी 31 वर्षांपासून तिथीनुसार स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. परिषदेचे सदस्य प्रत्येक वर्षी पशुपतीनाथचा दुर्वाभिषेक करून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करतात. ज्योतिषाचार्य पं. उमेश जोशी यांच्यानुसार 1947 च्या रात्री 12 वाजता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे, त्यावेळी देशाच्या कुंडलीत कालसर्प योग आहे. यामध्ये राहू-केतू आणि शनीचा वास असल्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये संपन्न असूनही देशात भूक, अस्थिरता आणि भीतीची स्थिती राहते. महादेवाचा दुर्वा आणि जलाने अभिषेक केल्याने अशाप्रकारच्या सामूहिक संकटांपासून मुक्ती मिळते.


नकारात्मक प्रभावापासून राष्ट्राला मुक्ती मिळेल - पं. उमेश जाेशी यांनी सांगितले की, शिवपुराणानुसार कोणत्याही प्रकारची सामूहिक आसक्ती, विनाश किंवा नकारात्मक शक्ती राष्ट्रावर प्रभाव टाकत असतील तर दुर्वाभिषेक यावर प्रभावी उपाय आहे. यामुळे आमची संस्था भगवान पशुपतीनाथ यांचा दुर्वाने अभिषेक करते. ही पंडित आणि यजमानांची संस्था असून यामध्ये 500 पेक्षा जास्त सदस्य आहेत. अभिषेक करून सर्व संकटांपासून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते.


अभिषेक झाल्यानंतर आरती - यावेळी तिथीनुसार 10 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता पशुपतीनाथ यांचा दुर्वाभिषेक होऊन महाआरती होईल.

बातम्या आणखी आहेत...