आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'चे विशेष प्रतिनिधी महेश जोशींना युनिसेफची फेलोशिप...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : दैनिक 'दिव्य मराठी'च्या औरंगाबाद आवृत्तीतील विशेष प्रतिनिधी महेश जोशी यांना युनिसेफ आणि नवी दिल्ली येथील चरखा डेव्हलपमेंट कम्युनिकेशन नेटवर्कची २०१९ वर्षाची फेलोशिप जाहीर झाली आहे. जून महिन्यात पुणे येथे युनिसेफची तीनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली होती. यात नवजात शिशूचा पहिल्या १००० दिवसांतील विकास' या विषयावर युनिसेफ आणि आरोग्य खात्यातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यशाळेत ही निवड करण्यात आली. महेश जोशी यांच्यासह पुणे येेथील प्रियदर्शिनी हिंगे, नाशिक येथील चारुशिला कुलकर्णी आणि प्रा. अमोल गुट्टे, मुंबई येथील ज्योती शेलार आणि वर्षा तोगलीकर यांचीही फेलोशिपसाठी निवड झाली आहे.

निवड समितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकाेलकर, निळू दामले आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचा समावेश होता. चरखा फाउंडेशनच्या वतीने अलका गाडगीळ, सुजाता शिर्के या प्रकल्पाच्या समन्वयक होत्या.
 

बातम्या आणखी आहेत...