आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, उद्धव ठाकरेंनी सपत्नीक घेतली राज्यपालांची भेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी सुरु झाले. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. कोळंबकर सर्व 288 आमदारांना शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत सर्व आमदारांचे स्वागत केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार यांची गळाभेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी सांगितले की, "आमची जबाबदारी आता वाढली असून संपूर्ण महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे." यासोबतच आज सकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राज्यपालांकडे पत्र
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. शिवसेेनेला पाठिंबा असल्याचे पत्र दाेन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे यावेळी सुपूर्दही केले.

शपथविधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायं. ६.४० वा. शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. काही मंत्र्यांचाही शपथविधी हाेईल.

बातम्या आणखी आहेत...