आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- बाजीराव बाळाजी भट (पेशवे) अर्थात थोरले बाजीराव यांची आज (18 ऑगस्ट) जयंती. मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. 1720 पासून ते तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावानेही ओळखले जाते.
'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटात प्रचंड विसंगती असल्याने सर्वत्र वाद सुरू झाला होता. यामुळे बाजीराव मस्तानीची लव्हस्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. यापूर्वीच मस्तानीच्या जन्मावरून, मृत्यूवरून अनेक वाद इतिहासात आहेत. मस्तानी मुळची कोण, कुठली ती बाजीरावांना कशी भेटली याबाबत अनेकांना माहिती नाही. बाजीराव यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही तुम्हाला मस्तानीची संपूर्ण माहिती सांगणार आहोत.
मस्तानी ही काही राजनर्तकी होती असे अनेक जण मानतात. मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे असे सांगितले जाते. मात्र मस्तानी राजनर्तकी नसून, ती बुंदेलखंडातील (छतरपूर, मध्यप्रदेश) छत्रसाल राजाची कन्या होती. मस्तानी ही या हिंदू राजाला त्याच्या मुस्लीम राणीपासून झालेली कन्या. छत्रसाल हा धर्मनिरपेक्ष विचारांचा होता. मस्तानी छत्रसालच्या प्रभावाखाली वाढली. त्यामुळे ती नमाज पठण आणि कृष्णाची पूजाही करायची. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गाणे तिला आवडायचे. तसेच ती धनुर्विद्येतही निपूण होती. मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली होती.
पुढील स्लाईडवर वाचा, कशी भेटली बाजीरावाला सौंदर्याची अप्सरा मस्तानी... दोघांमध्ये कसे जडले प्रेम....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.