Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Special Story For Valentine Day 14 Feb

निमित्त 'व्हॅलेंटाईन डे'चं..मानवच नव्हे सारस, धनेश पक्षीही प्रेम बंधनात; आयुष्यभर विरह, तरीही नवीन जोडीदार नाही

हेमंत जोशी, भुसावळ | Update - Feb 14, 2019, 04:08 PM IST

'हॅलेंटाइन दिनी' जोडपी एकत्र फिरतील, हातात हात घेतात, लग्नाच्या आनाभाका खातात.

 • Special Story For Valentine Day 14 Feb

  'हॅलेंटाइन दिनी' जोडपी एकत्र फिरतील, हातात हात घेतात, लग्नाच्या आनाभाका खातात. परंतु कदाचित तुम्हाला माहीत नसावे, मानवच नव्हे सारस, धनेश पक्षीही प्रेम बंधनात अडकतात. आयुष्यभर विरहात राहातात मात्र, नवा जोडीदार शोधत नाहीत...

  आयुष्यभर विरह... मात्र, शोधत नाहीत नवा जो‍डीदार..

  सारस : एकच जोडीदार, मृत्यूनंतर विरह
  सारस म्हणजेच क्रोंच हा पक्षी नेहमी नर-मादीच्या जोडीनेच दिसून येतो. जगात सारस पक्ष्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. आपला जोडीदार गमवल्यानंतर एकटा सारस नर किंवा मादी संपूर्ण आयुष्य एकांतात, विरहात घालवते. रामायण ग्रंथातही सुरुवातीला सारस पक्षाच्या जोडीतील एकाच्या मृत्यूनंतरच्या विरहाचा उल्लेख आहे. सारस आयुष्यात कधीही आपला जोडीदार बदलत नाही. याचप्रमाणे राजहंस, चक्रवाक या पक्ष्यांची जीवनशैली आहे. राज्यभरातील पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातूनही ही बाब समोर आल्याचे वरणगाव येथील चातक संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले.

  पुढील स्लाइड्‍सवर वाचा..निस्सिम प्रेम करणार्‍या पाखरांविषयी..

 • Special Story For Valentine Day 14 Feb

  राखाडी धनेश : नर पुरवतो मादीला अन्न
  धनेश म्हणजेच भारतीय वंशाचा राखाडी धनेश (ग्रे-हॉर्न बील). या पक्ष्यांची मादी तिच्या प्रजनन काळात अंडी घालण्यापूर्वी छोट्याशा घरट्यात स्व:ताला कोंडून घेते. दोन महिन्यांच्या या काळात मादी धनेशला तिचा नर साथीदार दररोज खाद्य पुरवतो. अंड्यातून पिले बाहेर आल्यानंतर मादी घरटे फोडून पिलासह बाहेर निघते. नर व मादी धनेश आपल्या पिलांसाठी नवीन घरटे बांधतात. दोन महिने मादीला अन्न व खाद्याचा पुरवठा करण्याचे हे पक्षी विश्वातील दुर्मिळ उदाहरण आहे. सारस पक्ष्याप्रमाणेच धनेश पक्ष्यांचा जोडीदार आयुष्यभरासाठी असतो, असे बीएनएचएसचे अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी सांगितले.

 • Special Story For Valentine Day 14 Feb

  गिधाड : अन्नासाठी ७०० किमी झेप
  डायक्लोफिनॅक औषधांमुळे गिधाडांची संख्या घटून ते धोकाग्रस्त प्रजातीमध्ये गेले. जनावरांची मृत्यूपूर्वीच कत्तलखान्यात विक्री होत असल्याने केवळ मृत जनावरांचे मांस भक्षण करणाऱ्या गिधाड या पक्ष्यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. प्रजनन अवस्थेत असलेल्या मादीला किमान एकवेळचे अन्न मिळावे म्हणून नर गिधाड तब्बल ७०० ते ८०० किलोमीटर अंतराचे उड्डाण घेतो. निसर्ग व अन्न साखळीतील स्वच्छतादूत म्हणून ओळख असलेले गिधाड आपल्या मादीला भरवण्यासाठी करणारी कसरत सहजीवनाचे, प्रेमबंधाचे दुर्मिळ उदाहरण असल्याचे गिधाडांचे नागपूर येथील अभ्यासक डॉ. बहार बाविस्कर यांनी सांगितले.

Trending