आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैष्णो देवीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेने घेतला हा मोठा निर्णय; यामुळे प्रवास होणार आणखी सुखर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - वैष्णो देवीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी यशवंतपुर-हजरत निजामुद्दीन (06521/06522) या विशेष ट्रेनला आता श्री वैष्णो देवी कटरापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी चार एप्रिल ते चार जून दरम्यान दर गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता यशवंतपूरवरून कटरासाठी रवाना होणार आहे. यशवंतपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. येथून सकाळी 3.50 वाजता निघून सायंकाळी 6.50 वाजता कटरा येथे पोहणार आहे. 


असा असेल परतीचे वेळापत्रक
या गाडीचा परतीचा प्रवास 8 एप्रिल ते 24 जून दरम्यान दर सोमवारी श्री वैष्णो माता देवी कटरा येथून सकाळी 5.40 वाजता सुरु होईल आणि दुसऱाय दिवशी दुपारी साडेतीन वाजता यशवंतपूर येथे दाखल होईल. 


या स्टेशन्सवर घेणार थांबा

ही गाडी नवी दिल्ली, अंबाला छावनी, लुधियाना, जालंदर छावनी, पठाणकोट छावनी, जम्मूतावी आणि उधमपूर इत्यादी स्टेश्न्सवर थांबा घेणार आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...