आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरबी जंगल परिसरामध्ये बिबट मादीचा संशयास्पद मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरखेड- उमरखेड वनपरिक्षेत्रासह पैनगंगा अभयारण्यात येणाऱ्या खरबीच्या जंगलात बिबट जातीच्या ९ ते १० वर्ष वयोगटातील मादी वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. ३० नोहेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेमुळे वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी सकाळीच घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना फुलसावंगी ते किनवट रस्त्यावर असलेल्या खरबी जंगलात घडली. बिबट्याचा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी पशूवैद्यकीय अधिकाऱ्याचा आणि प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. असे पैनगंगा अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी प्रमोद पंचभाई यांनी सांगितले. 


उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य अंतर्गत खरबीच्या ६९४ कंपाटॅमेंट मध्ये बिबट जातीच्या मादीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली. 


उमरखेड परिसरात पट्टेदार वाघाचा वावर 


या जंगलात पट्टेदार वाघाचा वावर असून या बिबट्याचा मृत्यू एकमेकांच्या हल्ल्यात झाला असावा. मागील वर्षी जवळपास ११ पाणवट्याची निर्मिती केली आहे. या पाणवठ्यावर सोलरपंप लावण्यात आले असून वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याच्या भटकंतीत हा बिबट आला नसावा. 


अभयारण्यात बिबटची संख्या अनिश्चित 
दर चार वर्षाला भारतीय वन्यजीवांच्या जनगणना होतात. त्यातच जिल्ह्यातील मोठ्या अभयारण्यात वन्य जीवांची गणना होते. त्यामुळे हा आकडा आमचेकडे नसतो, परंतु बिबट, पट्टेदार वाघाची पणावठ्यावरील जनगणना खरी नसते. त्यामुळे आम्ही ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून अंदाज व्यक्त करतो. त्यामुळे बिबट, पट्टेदार वाघ नेमके किती असावे हे निश्चित सांगता येणार नाही. प्रमोद पंचभाई, विभागीय वन परिक्षेत्राधिकारी. 


खरबी जंगल परिसरात बिबट मादीचा छिन्नविछीन्न अवस्थेतील मृतदेह आढळला.

बातम्या आणखी आहेत...