आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्त गडचिरोलीत मदतीला वेग, आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवले; आता संकट साथरोग पसरण्याचे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने उसंत दिल्याने पूरपरिस्थिती हळूहळू ओसरत आहे. मात्र, गोसेखुर्द, मध्य प्रदेशातील संजय सरोवर, कालीसरार धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वैनगंगा, इंद्रावती व प्राणहिता नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. चामोर्शी नाल्याजवळ चारही बाजूंनी पाणी वाढल्याने अडकलेल्या १६ जणांना बचाव पथकाने सुरक्षितरीत्या बाहेर काढले. नाल्याला आलेल्या पुरात दोघे वाहून गेल्याची घटना सोमवारी घडली. रामदास मादगू उसेंडी (निमगाव, तालुका धानोरा) हा मेंढा येथील नाल्यावरून तर सुधाकर पोटावी हेही पुरात वाहून गेले.
भामरागड तालुका मुख्यालयी संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुमारे ५०० हून अधिक लोकांना वेळेपूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कुरखेडा तालुक्यातील मालेवादा येथील २५ पूरग्रस्तांना सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आले.

जंतुनाशकांची फवारणी, पाणी उकळून पिण्याच्या सूचना

पुरामुळे पाण्याचे स्रोत दूषित झाले असल्याने आता जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये रोगराई पसरण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर उपाय म्हणून शक्य तेवढ्या प्रमाणात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, जंतुनाशकांची फवारणी, पाणी उकळून पिण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. जवळपास आठवडाभर जिल्ह्याच्या अनेक भागांत महापुराने थैमान घातले. अनेक भागांत आताही पाणी साचलेले आहे. पुरातून सुटका झाली असली तरी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. शक्य तेवढ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कॅन्स पुरवण्याचे प्रयत्न होत आहेत. जंतुनाशकांची फवारणी सुरू आहे. पाणी उकळून पिण्याच्या सूचना गावकऱ्यांना दिल्या जात आहेत, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार कैलास अंडिल या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पूरग्रस्त भामरागड भागाचा दौरा करून पाहणी केली. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यंत्रणेला पाण्याच्या स्रोतांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आजार पसरू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आवश्यक औषधांचा साठा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

चौघांना वाचवले

उपविभागीय अधिकारी काटाराम तेलंगणा यांनी पंकेना (ता. महादेवपूर, तेलंगणा) येथे गोदावरी नदीमध्ये ४ नागरिक अडकल्याची माहिती देऊन अासरअली पोलिस ठाण्याकडे मदतीची मागणी केली. अासर अली पोलिस ठाण्याकडून वन विभागाची बोट घेऊन सोमणपल्ली ते पंकेना असे नदी प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाऊन ४ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

शेंदुर्णीच्या बालकाचा पुराच्या पाण्यात मृत्यू
जळगाव : जामनेर तालुक्यातील रोटवद शिवारातील लोहारा-जळगाव रोडवरील नाल्याला आलेल्या पुरात रिक्षासह सात लोक वाहून गेले. यात काहीजण झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याने बचावले. मात्र, शेंदुर्णी येथील दिनेश प्रवीण गुजर १३ वर्षीय मुलगा पुरात वाहून गेला. पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता इतकी होती की, रिक्षा तीन किमीपर्यंत वाहत गेली. दिनेशचा मृतदेह मंगळवारी सकाळी रोटवद शिवारात आढळून आला.

सहा मजुरांची सुटका
भंडारा जिल्ह्यातील माेहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथे एक वृद्ध तसेच कारधा येथे अडकलेल्या सहा मजुरांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ताज्या माहितीनुसार वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. वैनगंगेची धोक्याची पातळी २४४.५० मीटर तर इशारा पातळी २४४.०० मीटर असून नदी सध्या २४६.८० मीटरवरून वाहत आहे.

पूरग्रस्त भागाला जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाची भेट
सांगल
ी : पुढील शंभर वर्षांत पुन्हा असा महापूराचा फटका बसू नये असे नियोजन करण्याची चर्चा जागतिक बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी केली. या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी बैठक घेतली. विविध बँकांतील सुमारे वीस सदस्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

पूरपरिस्थितीमुळे वडिलांचे अंत्यदर्शनही घेता आले नाही

नागपूर : संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पूरपरिस्थितीत पोलिस, महसूलसह संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. अशातच अंकुश श्रीकृष्ण शिरसाट या पोलिस शिपायाच्या वडिलांचे ७ सप्टेंबर रोजी निधन झाले. पण, पुराने वेढलेल्या भामरागडमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. शेवटी हृदयातला गहिवर डोळ्यात साठवून ते मदतकार्य करीत राहिले.

मूळ अमरावती येथील असलेले शिरसाट हे सध्या भामरागड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. ७ सप्टेंबरला भामरागड पुराने वेढले होते. कर्तव्यावर असताना वडिलांच्या निधनाची बातमी समजली. वरिष्ठांना याची माहिती मिळताच त्यांनी हेलिकाॅप्टरची मागणी केली. पोलिस विभागाने हेलिकाॅप्टर पाठवलेही, परंतु सर्वत्र पाणीच पाणी असल्याने व पाऊस सुरू असल्याने हेलिकाॅप्टर उतरवता आले नाही. अखेर ९ तारखेला परत हेलिकाॅप्टर पाठवून शिरसाठ यांना भामरागडबाहेर काढण्यात आले. तोपर्यंत अंत्यसंस्कार पार पडले होते.

४ दिवसांत करणार नुकसानीचे सर्वेक्षण, आपत्कालीन मदत सुरू

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली माहिती

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येत असून येत्या तीन ते चार दिवसांत नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष मदत देणार असल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. सिंह आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हवाई दौरा करून पाहणी केली. काही भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊनही माहिती घेतली. सध्याच्या परिस्थितीची माहिती देताना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले की, पुराचा फटका सर्वच तालुक्यांना बसला असला तरी भामरागड, आरमोरी, वडसा तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान असावे, असा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवला.

१५ हजारांपर्यंत मदत
उद्यापासूनच नुकसानीचा आढावा घेण्याच्या कामाला लागणार आहे. चार दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून मदत दिली जाणार आहे. मात्र, ताेपर्यंत न थांबता अनेक यंत्रणांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. सर्व काही गमावलेल्या कुटुंबांना १० ते १५ हजार रुपयांची मदतही केली जाणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
 
गडचिराेली जिल्ह्यातील भामरागड येथे साेमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून जवळपास १२० ग्रामस्थांचा प्रशासनासाेबत संपर्क होऊ शकला नाही. या भागात मदतकार्य पोहाेचवण्यास प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...