आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत हायस्पीड बाइकस्वाराने पोलिसाला उडवले, धक्कादायक Video सोशल मीडियावर व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येथील कार्टर रोडवर ट्रॅफिक पोलिस चेकिंगसाठी थांबले असताना एका भरधाव बाइकस्वाराने पोलिसालाच उडवले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये 2 पोलिस कर्मचारी ट्रॅफिक चेकिंग करताना दिसून येतात. त्याचवेळी एक बाइकस्वार भरधाव वेगाने आला. त्याने हेलमेट घातलेला नव्हता. पोलिस आपल्याला पकडून दंड आकारतील या भीतीने त्याने स्पीड आणखी वाढवली. या गोंधळात त्याने आपली बाइक पोलिस कर्मचाऱ्यावर धडकवली. या धडकेनंतर दोघेही पडले आणि दुसऱ्या पोलिसाने युवकाला आपल्या ताब्यात घेतले. पीडित पोलिस कर्मचारी गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...