आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्पन्नाचा ३० टक्केच करा फिरण्यावर खर्च, क्रेडिट कार्डचा वापर टाळा : अमेरिकी वेल्थ कंपन्यांचा सल्ला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुमचे उत्पन्न कमी असेल तर फिरण्यासाठी प्रवासाचे नियोजन खूप आवश्यक ठरते. त्यासाठी एकूण उत्पन्नाच्या ३० टक्क्यांतूनच प्रवासाची तरतूद निश्चित करा. यातून प्रवास सुखदायक आणि स्वस्ता होतो. अमेरिकी वेल्थ मॅनेजमेंट कंपन्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. अमेरिकी संस्था एएआरपीनुसार, या वर्षी डिसेंबरपर्यंत सुटीच्या हंगामात अमेरिकी ज्येष्ठ नागरिक प्रवासावर सर्वाधिक खर्च करतील. या वर्षीच्या प्रवासावर बेबी बूमर्सची सरासरी रुपये खर्च करण्याची योजना आहे. ४० ते ५५ वयातील लोकांची योजना सरासरी प्रति व्यक्ती ३,८८,११० रु. आणि मिलेनियल्सची प्रति व्यक्ती सरासरी ३,१६,२३८ रु. खर्च करण्याची योजना आहे. असे असले तरी विमान भाड्यातील वाढीमुळे बदल किंवा विमानाच्या विलंबासारख्या अप्रत्यक्ष खर्चांमुळे खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे त्याचे नियोजनही आवश्यक ठरते.
अंबुडो वेल्थच्या आर्थिक सल्लागार एरिक सीमन्सन यांच्यानुसार, सुटीसाठी रक्कम निश्चित करण्याचा सर्वात चांगला फॉर्म्युला मासिक उत्पन्नाची विभागणी ५०/ ३०/ २० या हिशेबाने व्हावी. ५० टक्के घरभाडे किंवा ईएमआय, अन्न, मुलांचे पालन पोषण यासारखे निश्चित खर्च आहेत तर ३० टक्के खर्च अप्रत्यक्ष किंवा पुन्हा विवेकानुसार कधीही खर्च करणारी रक्कम. अशाच पद्धतीने २० टक्के रक्कम बचत आहे. सीमन्सनुसार, प्रवासाचा खर्च निश्चित करण्यासाठी तुम्हाला गरजेचा ३० टक्के हिश्शाचा वापर केला पाहिजे. प्रवास खर्चाची जास्त रक्कम जुळवण्यासाठी रोजच्या खर्चासोबत रेस्तराँ, संगीत, खरेदी, गोल्फ सदस्यत्त्व किंवा मद्यात काही कपात केली पाहिजे.प्लिम्स फायनांशियल प्लानिंगमध्ये फायनांशियल प्लानर टायलर रिव्स म्हणाले, प्रवासासाठी आपत्कालीन िनधी, निवृत्तीच्या पैशाचा वापर करू नये. प्रवासादरम्यान क्रेडिट कार्डाच वापर नकाे. क्रेडिट कार्डाद्वारे जास्त खर्च केलेल्या रकमेवर व्याज चुकवण्यासाठी पुढील प्रवासावर परिणाम पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...