आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक गोठवताहेत शुक्राणू; तीन वर्षांत प्रमाण तिप्पट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवलसिंह राठोड | अहमदाबाद, सुरेंद्र स्वामी | जयपूर, अजयकुमार सिंह | पाटणा, पिलूराम साहू | रायपूर 

 

लष्करात दाखल होणे म्हणजे पहिल्या दिवसापासूनच बलिदानासाठी तयार होणे. सैनिकांना हे चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आता देशभर एक नवीन ट्रेंड समोर येत आहे. त्यानुसार सैनिकांचा कल शुक्राणू गोठवण्याकडे आहे. ‘दिव्य मराठी’ने त्याची पडताळणी केली तेव्हा गेल्या ३-४ वर्षांतच अशा सैनिकांची संख्या तिप्पट झाल्याचे समोर आले.  


अहमदाबादचे डॉ. भरत परीख यांनी सांगितले की, संवेदनशील भाग आणि सीमेचे संरक्षण करणारे सैनिक आयुष्यातील अनिश्चितता लक्षात ठेवून असा निर्णय घेतात. आमच्याकडे येणाऱ्या सैनिकांच्या पत्नीच त्यांना शुक्राणू गोठवण्यासाठी तयार करतात. जालंधरच्या डॉ. रिटा डिंगरा यांनी सांगितले की, सरकारतर्फे लष्करी रुग्णालयांत (एमएच) शुक्राणू गोठवण्यासाठी केंद्रे तयार केली आहेत. या रुग्णालयांत त्यासाठी पैसा घेतला जात नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांत यासाठी जाणाऱ्यांची संख्या १ ते २ टक्केच आहे.


डॉक्टर सांगतात की, जे अत्यंत दुर्गम भागात तैनात आहेत अशा सैनिकांचाच कल शुक्राणू गोठवण्याकडे आहे. अहमदाबादचे डॉ. नितीन लाल यांनी सांगितले की, आम्ही आमच्याकडे संवेदनशील सीमेवर तैनात सैनिकांचेच शुक्राणू गोठवतो. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा पत्नीसोबत कारगिलला गेलो होतो तेव्हा तेथील सैनिकांना पाहून हा निर्णय घेतला होता. पत्नीच्या आग्रहामुळेच सैनिक आमच्याकडे येतात. काश्मीरसारख्या भागांत कधीही काहीही घडू शकते.  


उणे १९६ अंश सेल्सियसमध्ये ठेवले जातात शुक्राणू  : अहमदाबादचे डॉ. धर्मेश कापडियांनी सांगितले की, सर्वात आधी व्यक्तीची रक्त चाचणी होते. त्यानंतर त्याच्या स्पर्म काउंटचे विश्लेषण होते. त्यानंतर शुक्राणू आणि त्याचे द्रव्य यांचे मिश्रण केले जाते. जेवढे शुक्राणू तेवढेच द्रव्य असते. दहा मिनिटांनी त्याचे तीन भाग करून संरक्षित केले जातात. एक नमुना फेल गेल्यास दुसरा पर्याय राहावा यासाठी तीन भाग करतात. नमुन्यांवर डॉक्टर आणि शुक्राणू गोठवणाऱ्याचा तपशील असतो. हा नमुना लिक्विड नायट्रोजनमध्ये गोठवून ठेवतात. तापमान उणे १९६ अंश असते. अशा प्रकारे गोठवलेले शुक्राणू अनेक वर्षे संरक्षित ठेवले जाऊ शकतात.  


गुजरात : बहुतांश केंद्रांवर मोठ्या संख्येने येत आहेत सैनिक  
२०१३ ते २०१८ दरम्यान गुजरातमध्ये सैनिकांद्वारे शुक्राणू गोठवण्याच्या प्रकरणांत तिप्पट वाढ झाली आहे. अहमदाबादच्या स्पर्म बँकेचे डॉ. हिमांशू बीवीसी म्हणाले की, २०१३ ते २०१५ या काळात २५-३० सैनिकांनी शुक्राणू गोठवले. २०१६ ते २०१८ मध्ये हा आकडा वाढून १३० ते १४० झाला आहे. अशाच प्रकारे अक्षरा आयव्हीएफ, रोजमेरी रुग्णालयात २०१३ ते २०१५ मध्ये २-३ सैनिकांनी शुक्राणू गोठवले. २०१६ ते २०१८ मध्ये ही संख्या २५ वर पोहोचली.


शेखावाटी भागातील सैनिक आघाडीवर
येथे लष्कर, नौदलात काम करणाऱ्या सैनिकांत शुक्राणू गोठवण्याचा ट्रेंड वाढला आहे. शेखावाटी भागातील सैनिकांत हा ट्रेंड जास्त आहे. जयपूरच्या एका फर्टिलिटी सेंटरच्या संचालकाने सांगितले की, शेखावाटीतील सीकर, चुरू, झुंझुनू या जिल्ह्यांत तीन वर्षांपूर्वी ५-१० सैनिक फ्रीजिंग करून घेत होते. ही संख्या आता ३० वर गेली आहे. काही सैनिकांनी गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकातही फ्रीजिंग करवून घेतले.


बिहार येथे उरी हल्ल्यानंतर मोफत सुविधा सुरू  
सृजन वंध्यत्व केंद्रात शुक्राणू गोठवणाऱ्या सैनिकांची संख्या ५ आहे. इन्फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. हिमांशू राय यांच्या मते, सैनिकांना स्पर्म बँकिंग आणि सल्ला देण्याची मोफत सुविधा दिली आहे. नोटीस बोर्डवर त्याची सूचनाही लावली आहे. उरी हल्ल्यानंतरच सैनिकांना ही सुविधा दिली जात आहे. सैनिकांना मोठी सूट आहे. शुल्क देण्याची गरज नाही.  


महाराष्ट्रात सामान्य लोकांपेक्षा सैनिकांत हा ट्रेंड जास्त  
सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत सैनिकांत स्पर्म फ्रीजचा ट्रेंड वाढला आहे. या प्रकरणातील तज्ज्ञांच्या मते, सामान्यांच्या तुलनेत सैनिकांत हा ट्रेंड ३५-४०% जास्त आहे. सामान्यांत स्पर्म फ्रीजिंगबाबत गैरसमज आहेत. बहुतांश पुरुषांना स्पर्म काउंट कमी येण्याची भीती वाटते. जेथे पत्नी राहते त्या गावाच्या/शहराच्या जवळच्या रुग्णालयांत सैनिक शुक्राणू गोठवून घेत आहेत.   


किस्सा - पत्नीच्या मृत्यूनंतर अडून बसलाय एक सैनिक  
रायपूरच्या एका आयव्हीएफ सेंटरमध्ये एका सैनिकाने आपले शुक्राणू आणि पत्नीचे बीजांड सुरक्षित ठेवले होते. त्यासाठी त्याने एक वर्षाचा करारही केला होता, पण तो दोन वर्षे आला नाही. सेंटरच्या प्रशासनाने वारंवार संपर्क केल्यानंतर आपण लवकरच त्याचा उपयोग करू असे तो सांगत असे. दोन वर्षे सुरक्षित ठेवल्यानंतर त्याने पत्नीला रुग्णालयात गर्भधारणेसाठी भरती केले. पण त्याच वेळी तिला स्वाइन फ्लू झाला. तिचा मृत्यू झाला. तिचे बीजांड सुरक्षित आहे. आता पहिल्या पत्नीच्या बीजांडाचाच वापर दुसऱ्या पत्नीसाठी करू यासाठी तो सैनिक अडून बसला आहे. लग्न ठरलेले नाही. इकडे शुक्राणू, बीजांड किती काळ सुरक्षित ठेवायचे, असा प्रश्न सेंटरसमोर आहे. 

बातम्या आणखी आहेत...