Home | National | Other State | Spice jet flight emergency landing in Jaipur after Tyre get bust

दुबईवरून येणाऱ्या स्पाइसजेट फ्लाइटचे टायर हवेतच फुटले; जयपूरमध्ये करावी लागली इमरजंसी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 03:38 PM IST

दुबईला परत जाणाऱ्या लोकांची विमान बदलण्याची मागणी

  • जयपूर- राजस्थानच्या जयपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर बुधवारी मोठा अपघात टळला. दुबईवरून येत असलेल्या स्पाइसजेट फ्लाइटच्या पायलटला लँडिंगच्या आधी विमानाचे उजवे टायर फुटल्याचे कळाले. पायलटने याची सूचना एअर ट्रॅफिक कंट्रोल(एटीसी)ला दिली. त्यानंतर जयपूरमध्ये विमानाची इमरजंसी लँडिंग करावी लागली. आता याच विमानाने दुबईला जाणारे लोक विमान बदलण्याची मागणी करत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइस जेटच्या दुबई-जयपूर फ्लाइट(एसजी 58)मध्ये 189 प्रवासी होते. सकाळी 9 वाजता लँडिंगनंतर सगळे प्रवासी सुखरूप बाहेर आले. यानंतर घटनेची माहिती डीजीसीएला पाठवण्यात आली.


    प्रवाशांच्या जयपूर एअरपोर्टवर गोंधळ
    आता जयपूर-दुबई फ्लाइट एसजी 57 ने दुबईला जाणारे लोक गोंधळ करत आहेत. ते सगळे प्रवासी आता विमान बदलण्याची मागणी करत आहेत. दुबईवरून जे विमान येते, तेच परत दुबईला जाते. सध्या याच विमानाला ठीक केले जात आहे.

Trending