आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, थोडीतरी लाज बाळगा', विमानात सहप्रवाशाने प्रज्ञा ठाकुर यांना सुनावले; व्हिडिओ व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आवडीचे सीट न मिळाल्यामुळे प्रज्ञा झाल्या नाराज

भोपाळ- स्पाइसजेटच्या विमानाने शनिवारी संध्याकाळी दिल्लीवरुन भोपाळला येत असताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकुर आवडीची जागा न मिळाल्यामुळे नाराज झाल्या. यावेळी त्यांचा एका सहप्रवाशासोबत वादही झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, सहप्रवासी प्रज्ञा यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

प्रज्ञा शनिवारr संध्याकाळी स्पाइसजेटच्या विमानाने दिल्लीवरुन भोपाळला येत होत्या. त्यांना सीट नंबर ए-2 देण्यात आली होती, पण प्रोटोकॉल म्हणून सीट नंबर ए-1 हवी होती. पण ही सीट दुसऱ्या एका प्रवाशाला देण्यात आली होती. संध्याकाळी 7 वाजता विमान भोपाळच्या राजाभोज एअरपोर्टवर लँड झाले. येथे सर्व प्रवासी उतरले, पण प्रज्ञा उतरल्या नाहीत. स्पाइसजेटच्या क्रुने त्यांना बाहेर येण्यास सांगितले पण त्या आल्या नाहीत. थोड्यावेळानंतर एयरपोर्ट डायरेक्टर अनिल विक्रम विमानतळावर आल्याचे कळताच त्या विमानातून उतरल्या. त्यांच्या या कृत्यामुळे विमानाला परत दिल्लीला पोहचण्यास 20 मिनीटांचा उशीर झाला.

बातम्या आणखी आहेत...