आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Spiderman: Far From Home' Film Get Leaked Online Before Releasing In US And India

'स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम' चित्रपट यूएस आणि भारतात रिलीज होण्याआधीच झाला ऑनलाइन लीक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : हॉलिवूड चित्रपट 'स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम' रिलीजपूर्वीच फाइल शेयरिंग वेबसाइट्सवर लीक झाला आहे. मार्वल स्टूडियोजचा हा सुपरहीरो चित्रपट मागच्या वीकेंडला चीनसह काही आशियाई देहसनामध्ये रिलीज केला गेला होता. मात्र यूएसच्या चित्रपट गुहांमध्ये 2 जुलैला लागणार आहे. तर भारतात याची रिलीज डेट 4 जुलै आहे. मात्र यापूर्वीच चित्रपटाचे निकृष्ट दर्जाचे व्हिडीओज फाइल शेयरिंग वेबसाइट्सवर आले आहेत.  

 

चीनी सबटायटल्ससोबत आहेत हे व्हिडीओ... 
व्हिडीओ पाहून वाटते की, हे चीनमधून लीक केले गेले आहेत. यामध्ये चीनी सबटायटल्सदेखील आहेत. फाइल्स 1 जीबीपासून 2 जीबीच्या साइजमध्ये उपलब्ध आहेत. मात्र रनिंग टाइम खऱ्या चित्रपटाचा एकूण वेळ 2 तास 15 मिनिटांच्या तुलनेत दोन तासांपेक्षाही कमी आहे. काही फाइलयामध्ये रूसच्या सट्टेबाज कंपन्यांच्या जाहिराती आहेत, जे अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये असणे सामान्य आहे. 

 

वीकेंडला चीनमध्ये 668 कोटींपेक्षा जास्त कमवले...  
'स्पायडरमॅन : फार फ्रॉम होम'ने चीनमध्ये पहिल्या वीकेंडला 97 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 668.7 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे बजेट 160 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1103 कोटी रुपये आहे. टॉम हॉलैंड, जेक गिलेनहाल, शमूएल एल. जॅक्सन आणि मारिया टोमी स्टारर हा चित्रपट जॉन वाट्सने दिग्दर्शित केला आहे. हा मार्वल स्टूडियोजचा 23 वा सुपरहीरो चित्रपट आहे. 

बातम्या आणखी आहेत...