आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदयापासून मेंदूपर्यंत सर्व अवयवांसाठी पालक गुणकारी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबीन वाढवण्याच्या दृष्टीने फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण आढळून येतात.... पालकाला एक गुणकारी पालेभाजी मानली जाते, परंतु केवळ हिमोग्लोबीन वाढवण्याच्या दृष्टीने फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. १०० ग्रॅम पालकामध्ये २६ किलो कॅलरी ऊर्जा, प्रोटीन २.० टक्के, कार्बोहायड्रेट २.९ टक्के, वसा ०.७ टक्के आणि रेशे ०.६ टक्के असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. याच गुणांमुळे पालकाच्या भाजीला लाइफ प्रोटेक्टव्ह फूड मानले जाते. आज आम्ही तुम्हाल पालकाचे काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत. - यात आयोडिन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो. - पालकांच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रेमध्ये मिसळून सकाळ, संध्याकाळ घेतल्यास यामुळे मुतखडा विरघळून बाहेर पडेल. - कच्चा पालकही खूप गुणकारी आहे. यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सूज असल्यास पालकाच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होईल. - पालकाच्या एक ग्लास ज्यूसमध्ये चवीनुसार काळे मीठ टाकून सेवन केल्यास दम आणि श्वासाच्या आजारामध्ये लाभ होईल. - ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडिन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो. - कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल. - लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते. - थायरॉइडचा त्रास असल्यास एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिऱ्याचे चूर्ण टाकून सेवन केल्यास लाभ होईल. - पाताळकोट येथील आदिवासी लोक पालकाच्या रसाने गुळण्या करण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार असे केल्याने दातांच्या समस्या दूर होतात, तोंडाची दुर्गंधी दूर होते. - एनिमिया किंवा शरीरात रक्ताची कमतरता असल्यास दररोज पालकाचा एक ग्लास रस अवश्य घ्यावा. हृदयाचा आजारासाठी एक कप पालकाच्या रसाचे २ चमचे मध टाकून सेवन करावे.