Home | National | Delhi | Split in the political Parties in NDA over RS deputy Speaker election

राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीच्या उमेदवारीवरून एनडीएत धुसफूस, शिवसेना-अकाली दल नाराज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 07, 2018, 11:52 AM IST

एवढी मोठी घोषणा करण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही.

  • Split in the political Parties in NDA over RS deputy Speaker election

    नवी दिल्ली - राज्यसभेच्या उपसभापतीपदावरून एनडीएमध्ये फूट पडल्याचे चित्र समोर येत आहे. एनडीएकडून या पदासाठी जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र एनडीएमधील शिवसेना आणि अकाली दल हे पक्ष या निर्णयामुळे नाराज असल्याचे समजतेय.


    अकाली दलला राज्यसभेत उपसभापतीपदासाठी उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. अकाली दलच्या नरेश गुजराल यांचे नावही त्यासाठी चर्चेत होते. पण अंतिम क्षणी भाजपने जेडीयूचे खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिल्याने अकाली दल नाराज आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या घरी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिर सिंह बादल यांच्या नेतृत्वात अकाली दलच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. 9 ऑगस्टला राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत अकाली दलाचे खासदार अनुपस्थित राहण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. अमित शहांनी याबाबत अकाली दलचे प्रमुख प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. तरीही अकाली दल याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


    दुसरीकडे शिवसेनाही या घोषणेनंतर नाराज असल्याचे समजतेय. एवढी मोठी घोषणा करण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता अमित शहा एनडीएच्या नेत्यांबरोबर याबाबत फोनवर चर्चा करत असल्याचे समजतेय.

Trending