Cricket / Sport News : अध्यक्ष प्रसाद यांची स्पष्टाेक्ती : क्रिकेटचे अधिक सामने खेळल्याने परीपूर्ण हाेत असल्याचा गैरसमज

निवड  समिती हातचे बाहुले असल्याचा गावसकरांचा आराेप

वृत्तसंस्था

Jul 31,2019 09:31:00 AM IST

नवी दिल्ली - विराट काेहलीकडे पुन्हा संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्याच्या प्रकरणावरून माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी निवड समितीच्या निर्णयावर प्रचंड टीका केली. याशिवाय त्यांनी दाेन दिवसांपूर्वी काेहलीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच गावसकरांनी निवड समिती ही हातातील बाहुले बनली आहे, अशा कडक शब्दांत समितीवर टीकास्त्र डागले हाेते. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


निवड समितीच्या पाचपैकी तीन सदस्यांच्या अनुभवावरही सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. यातील तीन सदस्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा माेठा अनुभव नाही. त्यामुळेच टीका केली जाते.

१६ वर्षीय सचिनची संघात निवड करणाऱ्या डूंगरपुर यांनाही अधिक अनुभव नव्हता : प्रसाद

> निवड समितीच्या अनुभवावर सातत्याने टीका केली जाते, यामुळे तुम्हाला कसा त्रास सहन करावा लागत आहे?
सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिताे की, निवड समितीमधील सर्वच सदस्य हे भारतीय संघाचे माजी खेळाडू आहेत. त्यामुळे माेठ्या संख्येत आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या फाॅरमॅटमधील आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. तसेच यासाठीच्या निवडीचा एक बेसिक क्रायटेरिया असताे. ताेदेखील आम्ही सर्वांनी पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वच फाॅरमॅटशिवाय आमच्या सदस्यांकडे ४७७ प्रथम श्रेणीच्या सामन्यांचाही माेठा अनुभव आहे. याशिवाय आमच्या कार्यकाळादरम्यान आम्ही २०० पेक्षा अधिक प्रथम श्रेणी क्रिकेट सामनेही पाहिले आहेत.


> समितीमधील तुम्ही सर्वांनी फक्त १३ कसाेटी सामनेच खेळले आहेेत, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण हाेत आहे?
जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या अनुभवाचा विचार केल्यास, सर्वप्रथम आपण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या (ईसीबी) निवड समितीचे चेअरमन स्मिथ यांच्या बाबतीची माहिती घेऊ. त्यांच्याकडे निवड समितीचे नेतृत्व आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्यांनी करिअरमध्ये फक्त एकच कसाेटी सामना खेळला आहे. मात्र, तरीही ईसीबीने संघ निवडीबाबतचे सर्व अधिकार स्मिथ यांना दिले आहेत. तसेच अवघे सात कसाेटी सामने खेळलेले ट्रेवर होन्स हे सध्या क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या (सीए) निवड समितीचे अध्यक्ष आहे. त्यांच्याकडेही संघ निवडीबाबतचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळेच अनुभव अधिक असला की क्रिकेटबाबतचा समजूतदारपणा अधिक वाढत, असा गैरसमज आपल्या देशात पसरलेला आहे. कमी अनुभव असूनही बलाढ्य आणि संतुलित संघ निवड करण्यात स्मिथ आणि ट्रेवर होन्स यांचा हातखंडा आहे. त्यांच्यावर अशा प्रकारची टीका कधीही झाली नाही. मात्र, दुर्दैवाने भारतामध्ये अशा प्रकारची टीका केली जाते.


> दुबळा निवड समिती अध्यक्ष अशी टीका हाेते, यावर प्रतिक्रिया काय ?
हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही दिग्गज क्रिकेटपटूंचा मान ठेवताे. प्रत्येक गाेष्टीवर आम्ही त्यांचा सल्लाही घेताे.तरीही अशा प्रकारची आमच्यावर टीका हाेते. याचे द:ुख हाेत नाही तर आमच्यातील सर्वच गुणांचा यातून विकास हाेताेे. कुठे चुकताेय आणि काेणता निर्णय घ्यावा, याबाबतची माहिती सहज लक्षात येते. तसेच या टीकेचा आम्ही फारसा विचार करत नाही. त्यामुळेच कामात पारदर्शकता निर्माण हाेते. मात्र, अशा प्रकारच्या टीकेने निवड समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयावर आणि त्यांच्या निर्णयक्षमतेवर काेणत्याही प्रकारचा फरक पडत नाही. हे सर्वच खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना सर्वांची क्षमता आणि कुशलतेची माहिती आहे.


> प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट काेहलीचे समितीशी नेहमी मतभेद होतात, तरीही परिस्थिती कशी संतुलित केली जाते. यासाठी त्या दाेघांचा समितीवर दबाव असताे का?
प्रशिक्षक शास्त्री आणि विराट काेहली हे नॅशनल टीमचे काेच आणि कर्णधार आहेत. तसेच माजी कसाेटीपटू राहुल द्रविड हा भारतीय अ संघाचा प्रशिक्षक आहे. सर्वांची वेगवेगळी भूमिका आणि जबाबदारी आहे. मात्र, असे असूनही आम्ही सर्वांशी एकजुटीने काम करण्यासाठी प्रयत्नशील असताे. यादरम्यान अनेक वेळा विचारात वेगळेपण असते. त्यामुळे निर्माण झालेले मतभेद क्षणिक असतात. त्याचा काेणत्याही प्रकारचा दबाव नसताे.त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे आमचे निर्णय घेत असताे. त्यासाठी दबाव नसताेे.

X
COMMENT