आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा अधिकारी वणवेंचा उपचारादरम्यान मृत्यू; इनोव्हा कारने उडवले, 11 दिवस सुरू होते उपचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईला जेवू घालून घरी परतणारे तालुका क्रीडा अधिकारी संजय शंकर वणवे (४४, रा. सुंदरनगर, नागेश्वरवाडी) यांना २९ डिसेंबर रोजी आकाशवाणी चौकात इनोव्हा कारने उडवले होते. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अनेक वर्षे नाट्यचळवळीत हिरीरीने सहभाग नोंदवणाऱ्या वणवे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

वणवे जालना येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून त्यांच्या आईवर जालना रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २९ डिसेंबर रोजी रात्री आईसाठी जेवणाचा डबा घेऊन ते रुग्णालयात गेले होते. यानंतर दुचाकीने (एमएच ०६ एवाय ६९७६) ते घरी निघाले. आकाशवाणी चौकात त्यांना भरधाव इनोव्हा (एमएच १३ ९०९९)कारने मागून धडक दिली. जोराच्या धडकेमुळे ते लांब फेकले गेले. यात त्यांचा पाय, हात व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

 

नाट्यचळवळीमध्ये होता सक्रिय सहभाग 
गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. वणवे यांचे नातलग संतोष डोळे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या इनोव्हा कारचालकाचा शोध घेत आहेत. क्रीडा अधिकारी असलेले वणवे नाट्यकर्मी होते. अनेक वर्षे त्यांचा नाट्यचळवळीत हिरीरीने सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे नाट्यक्षेत्र व क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. 
 

बातम्या आणखी आहेत...