आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राला हानी पोहोचवणारा निर्णय, लाेकप्रतिनिधींमध्ये नाराजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळवले; जागा संपादन केल्यानंतरही डावलले

औरंगाबाद - मराठवाड्यातील लाेकप्रतिनिधींनी औरंगाबाद येथील नियाेजित क्रीडा विद्यापीठ पुण्याकडे वळवण्याच्या अर्थमंत्री अजीत पवार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या निर्णयामुळे मराठवाड्यातील खेळाडुंचे माेठे नुकसान हाेणार आहे. याशिवाय क्रीडा विद्यापीठ दुसरीकडे झाल्याने मराठवाड्याच्या प्रगतीशील क्रीडा क्षेत्राची हानी करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे याबाबत सरकारने पुर्नविचार करावा, अशा प्रकारची मागणीही यांच्या वतीने करण्यात आली. याशिवाय औरंगाबादसह मराठवाड्यातील  खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांमध्ये  प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी आंदाेनलाचा पवित्रा घेण्याची तयारी दर्शवली.आघाडी सरकारचा अन्याय : सावे


पुणे शहरामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. असे असतानाही, औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ पुणे येथे हलवण्याचा निर्णय चुकीचा आहे. आघाडी सरकार याच्या आधारे मराठवाड्यातील खेळाडूंवर अन्याय करत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील क्रीडा क्षेत्राचे मोठी हानी होणार आहे. शासनाच्या जागेवरच हे क्रीडा विद्यापीठ होणार होते. त्यामुळे मराठवाड्याला क्रीडा विश्वात अजून मोठी भरारी घेतली असती. मात्र आघाडी सरकार याच्यामध्ये आडकाठी निर्माण करत आहे. खेळाडूवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहे. 
- आ. अतुल सावे, आैरंगाबादराजकारणातून नुकसान करणारा निर्णय : बंब

क्रीडा विद्यापीठ पुण्यात हलवण्याचा निर्णय  राजकीय सुडापोटी घेतला.  खेळाडूचा हा अन्याय दूर करण्यासाठी मी जाब विचारणार आहे.  हाच दृष्टीकोन लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रीडा विद्यापीठाची घोषणा केली.  सूडापोटी ही घोषणा लावली आहे. मात्र पुण्यात अशा प्रकारचे विद्यापीठ मी होऊ देणार नाही. 
- आ.प्रशांत बंब, गंगापुर

खेळाडूंसाठी आता लढा देण्याची गरज : काळे

पुणे येथे पहिलेच बालेवाडी क्रीडा संकुल असून तेथे अनेक क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. येथून क्रीडा विद्यापीठ त्याठिकाणी पळवण्याचा निर्णय चुकीचा आहे. यासाठी मी स्वत: उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्र्यांची भेट घेणार आहे. याच्याशी सखाेल चर्चा करून मी पुढील दिशा ठरवणार आहे. मात्र, एकुणच यासाठी लढा देण्याची आमची तयारी आहे. -आ. विक्रम काळे,  आैरंगाबाद

औरंगाबादमध्ये उपकेंद्राचा प्रयत्न करणार : चव्हाण   

औरंगाबादचा क्रीडा क्षेत्रात दबदबा आहे.  येथील खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचवावा, गुणवत्तेला चालना मिळावी, यासाठी मी औरंगाबाद येथे क्रीडापीठाचे उपकेंद्र करण्यासाठी प्रयत्नशील राहील.  खेळाडूंना माेठा फायदा हाेईल. पुण्यात यासाठीच्या सर्व काही साेयी-सुविधा उपलब्ध आहेत. सरकारने क्रीडापीठ पुण्यात करण्याचा  निर्णय घेतला 

आ. सतीश चव्हाण,  औरंगाबाद

आम्ही जाब विचारणार : जैस्वाल

आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबाद, मराठवाड्यातील खेळाडू कर्तृत्वाचा झेंडा उंचा होत आहेत. क्रीडा विद्यापीठ दुसरीकडे पळून देण्याचा प्रकार निंदनीय आहे. मी  अर्थमंत्री  यांच्याशी चर्चा करणार. माझा प्रयत्न असेल. ही घोषणा रद्द करून  क्रीडा विद्यापीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. आ. प्रदीप जैस्वाल, औरंगाबादबातम्या आणखी आहेत...