Home | Sports | From The Field | spot fixing case life ban on sreesanth remove supreme court

श्रीसंतवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली, आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा होता आरोप   

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 16, 2019, 09:28 AM IST

या क्रिकेटपटूच्या विरोधात बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत

  • spot fixing case life ban on sreesanth remove supreme court

    नवी दिल्ली - आयपीएलच्या २०१३ मधील स्पर्धेतील स्पॉट फिक्सिंगमध्ये कथित सहभागावरून क्रिकेटपटू श्रीसंत याच्यावर लावलेला तहहयात बंदीचा बीसीसीआयचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्दबातल ठरवला. यावर तीन महिन्यांच्या आत विचार करावा, असे न्या. अशोक भूषण आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने म्हटले आहे.


    या क्रिकेटपटूच्या विरोधात बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार सट्टेबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत, हा बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

Trending